सशक्त भारत अभियानाचे पशुवैद्यक महाविद्यालयात आयोजन 
सशक्त भारत अभियानाचे पशुवैद्यक महाविद्यालयात आयोजन 


पशुवैद्यक महाविद्यालय उदगीर येथे कौशल्य विकास कार्यक्रमातंर्गत ‘सशक्त भारत अभियान’ विद्याथ्र्याकरीता राबविण्यात आले. यानिमीत्त आयोजित कार्यक्रमासाठी मंचावर महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डाॅ. रावजी मुगळे हे अध्यक्षस्थानी होते, तर उदगीर कराटे असोशियनचे अध्यक्ष श्री. संदीप पवार हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभले. श्री. पवार यांनी आपल्या मार्गदर्शनात विद्याथ्र्यांना संबोधित करतांना म्हटले की, ख-या अर्थाने समाजातील कुप्रवृत्तीवर आळा घालण्यासाठी विशेषतः महिलांनी प्रतिकार आणि लढण्यासाठी सक्षम बनले पाहिजे. यावेळी श्री. पवार आणि त्यांच्या चमुंनी कराटेचे प्रात्यक्षिक लाभार्थी विद्यार्थी आणि विद्यार्थीनी यांना करून दाखविले. अध्यक्षीय भाषणात सहयोगी अधिष्ठाता डाॅ. रावजी मुगळे यांनी म्हटले की, आरोग्य ही मानवाची सर्वांत मोठी धनसंपत्ती असून त्याकरीता विद्याथ्र्यांनी नियमितपणे शारीरिक कसरती व व्यायाम करावा. शारीरिकदृष्टया मजबुत असाल तर बौद्धिक प्रगती सु़द्धा गाठाल. शारीरिक सुदृढता मानवास आत्मनिर्भर करते आणि विघातक प्रवृत्तीपासून सुरक्षित ठेवते. कार्यक्रमाप्रसंगी आयोजन समितीचे अध्यक्ष डाॅ. सुधाकर अवंडकर यांनी प्रास्ताविक केले तर सुत्रसंचालन डाॅ. प्राजक्ता जाधव यांनी केले. डाॅ. संभाजी चव्हाण यांनी आभार प्रकट केले. यावेळी डाॅ. नरेंद्र खोडे, समन्वयक डाॅ. मंगेश वैद्य, डाॅ. एस.वाय.शिराळे, डाॅ. पंकज हासे, डाॅ. रविंद्र जाधव यांच्यासमवेत बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते.