प्रधानमंत्री विधवा समृद्धी योजनेची आमल बजावणी करा.
जीवन विकास सेवाभावी संस्थेच्या वतीने एकल महिलांचे निवेदन,
जीवन विकास सेवा भावी संस्था नळगीर,ही संस्था समाजातील तळागाळातील वंचित आणि दुर्बल घटक यांच्या कल्याणासाठी कार्य करीत आसुन 2019 मध्ये या संस्थेचे निर्माण करण्यात आले आहे सरकारने प्रधानमंत्री विधवा समृद्धी योजना सर्व राज्यात लागु केली आसुन विधवा महिला चे कोलमडलेले जीवन सुधारावे या हेतुने सरकार कडुन पात्र लाभार्थी याना प्रत्येकी पाच लाख रुपये त्यांचे खातेवर जमा करुन आर्थिक लाभ देण्याची तरतुद आहे,व त्या विधवा महिलेला शिलाई मशीन देण्याची ही या योजनेची तरतुद आहे, तसेच ईतर महिलांच्या उन्नती साठी ही प्रधानमंत्री क्रेडिट योजनेचे निर्माण करण्यात आले आहे मात्र दोन्ही योजनाची आमल बजावणी होत आसल्याचे दिसुन येत नाही,म्हणून या योजनेची आमल बजावणी करुन लाभ देण्यात यावा आशी मागणी सदर संस्थेच्या वतीने दि./4/3/2020 रोजी एकल महिलानी निवेदनाव्दारे केली आहे, सदरचे निवेदन तिस एकल महिलाच्या उपस्थितीत मा.उपजिलाधिकारी उदगीर, मा तहसिलदार उदगीर,व मा.गटविकास आधिकारी प.स. उदगीर यांना दिले आहे,
या योजनानचा प्रचार व प्रसार करण्यात आला नसल्याने महिलांना या योजने पासुन वंचित रहावे लागत आहे म्हणून उपस्थित एकल महिलानी या निवेदनाव्दारे नाराजी ही व्यक्त केले आहे,सदर योजनेचे प्रस्ताव व आवश्यक ती कागद पत्र कुठे व कुणाकडे दाखल करावे हे माहीती होत नाही आशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केले.या व्यवस्थेने आम्हाला अज्ञानी ठेऊन आमच्या वर आन्याय केला आहे, या आन्यायातुन मुक्त करणेसाठी महिलांना सक्षम बनविणे कामी संविधानीक तरतुदी आसताना फक्त योजना जाहीर केल्या जातात आमच्या पर्यंत त्या काही पोहचु दिल्या जात नाहीत आसे दुःख ही त्यांनी यावेळी व्यक्त केले.सदर योजनेची सविस्तर माहीती ग्रामपंचायती मार्फत देण्यात येऊन त्यांचे मार्फतच या योजनेचे प्रस्ताव दाखल करुन घेऊन ही योजना मिळवुन देणे कामी पाठपुरावा चालविण्यात यावा व या योजनांचा त्वरीत लाभ देण्यात यावा आशी मागणी या निवेदनाव्दारे करण्यात आली आहे या वेळी संस्थेचे अध्यक्ष मारुती गुंडीले, सह आर्चनाताई तोगरे, प्रभावती सोनकांबळे,लक्ष्मण रणदिवे, गोविंद शिंदे, राजकुमार सुर्यवंशी विकास बंलाडे, गौरव गुंडीले इत्यादी उपस्थित होते तर या निवेदनावर रिहाना खादुभाई,,ज्योती वाघमारे,सुरेखा गायकवाड़,विद्यावती काळे, शालिका काळे,सह चाळीस एकल महिलांच्या स्वाक्षर्या आसुन त्त्याचे बरोबर इतर ही महिला यावेळी उपस्थित होत्या.