:-उदगीर येथील 38 पत्रकाराच्या सह्याचे निवेदन गृहमंत्री,मुख्यमंत्री,पोलीस महासंचालक,विशेष पोलीस महानिरीक्षक नांदेड़,पोलीस अधिक्षक लातूर यांना उपजिल्हाधिकारी मार्फत देऊन केली मागणी
उदगीर:- प्रतिनिधी
लातूर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरसिंग घोणे यांना मंगळवारी 24 मार्च रोजी लातूर येथील शिवाजी चौकातुन कार्यालयात येत असताना लातूर चे उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन सांगळे व उपस्थीत पोलीस कर्मचा-यांनी अमानुष मारहाण केली होती.त्याचा उदगीर येथील पत्रकारानी निषेध करत गृहमंत्री व संबंधित पो. विभागाला निवेदन देऊन कार्यवाही व निलंबनाची मागणी केली आहे.
एकीकडे पंतप्रधान पत्रकाराचे कौतुक करतात,दुसरी कडे माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर पत्रकारास माराल तर कार्यवाही करु म्हणत असताना लातूर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरसिंग घोणे यांना लातूर चे उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन सांगळे व उपस्थीत पोलीसानी अमानुष मारहाण केली एवढेच नाही तर, का मारले असे फोन लाऊन विचारणाऱ्या संपादकास माजोरी उपविभागीय पोलीस अधिका-यांनी गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली.अशा माजोरी उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन सांगळे व मारहाण करणाऱ्या पोलीसावर कार्यवाही करुण त्वरित निलंबित करावे. अशा मागणी चे निवेदन उदगीर येथील उपजिल्हाधिकारी प्रविण मेंगशेट्टी यांच्या मार्फत गृहमंत्री अनिल देशमुख,मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,पोलीस महासंचालक मुंबई ,विशेष पोलीस महानिरीक्षक नांदेड़,राजेंद्र माने पोलीस अधिक्षक लातूर यांना देऊन करण्यात आले आहे.या निवेदनावर लातूर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे सह सचिव श्रीनिवास सोनी,सदस्य सुनिल हवा,भगीरथ सगर ,सचिन शिवशेट्टे,श्रीकृष्ण चव्हाण, विधिज्ञ .गोविंदा सोनी,विक्रम हालकीकर,अंबादास अलमखाने,निवृत्ती जवळे,रामबिलास नावंदर,महादेव घोणे,निलेश हिप्पळगावकर,विश्वनाथ गायकवाड,विधिज्ञ श्रावणकुमार माने,ईश्वर सुर्यवंशी,अर्जुन जाधव,नागेद्र साबने,रवि हसरगुंडे,बस्वेश्वर डावळे,बिभीषण मद्देवाड,महेश माठपती,संगम पटवारी ,माधव रोडगे,इरफ़ाण शैख,शैख अज़रोद्दींन,सिद्धार्थ सुर्यवंशी,एल.पी.उगीले, सुनिल मादळे,प्रभुदास गायकवाड,मंगेश सुर्यवंशी,एम.बी.पटवारी,अशोक तोंडारे,बबन कांबळे,बस्वराज बिरादार,व्हि.एस.कुलकर्णी,राम मोतीपवळे,अशोक कांबळे ,विनायक चाकुरे आदि च्या सह्या आहेत.