*जिल्हा परिषद अध्यक्षांच्या पुढाकाराने नावंदी व गूडसूर शिव रस्त्याचा वाद मिटला कामास प्रारंभ*
वाद ग्रस्त रस्त्याचे तोडगा काढायचे काम करणारे नूतन जिल्हापरिषद अध्यक्ष राहुल भैया केंद्रे यांच्या पुढाकाराने बऱ्याच वर्षापासून प्रलंबित असलेला नावंदी गुडसुर शिव रस्त्याचा वाद मिटवून कामास प्रारंभ झाला असून यावेळी गावातील नागरिकांना ,शेतकऱ्यांना जिल्हा परिषद अध्यक्ष मा राहुल भैया केंद्रे आणि तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांनी मार्गदर्शन केले लोकांच्या भावना जाणून घेतल्या आणि सगळ्यांच्या सहमतीने हा रस्ता अतिक्रमणमुक्त केला आणि रस्त्याच्या कामास नारळ फोडून सुरुवात केली यावेळी तहसीलदार वेंकटेश मुंडे नावंदीचे सरपंच भीमराव मादले, चेअरमन बालाजी परगे ,बालाजी बिरादार ,देविदास केंद्रे ,गजानन केंद्रे ,शैलेश देमगुंडे ,सतीश पाटील, जितेंद्र बिरादार, शत्रुघ्न केंद्रे , पत्रकार सिद्धार्थ सुर्यवंशी , बिभिषण म६ेवाड यांच्यासह मंडळ अधिकारी ग्रामसेवक, तलाठी व समस्त गावकरी उपस्थित होते