बचत गटाच्या माध्यमातून चांगले कार्य होत आहे--  सौ.मीनाक्षीताई पाटील 

बचत गटाच्या माध्यमातून चांगले कार्य होत आहे--  सौ.मीनाक्षीताई पाटील 



उदगीर— महिला बचत गट स्थापन करून सर्व विचारधारेने एकत्रित येऊन महिला काम करत आहेत. बचत गटाच्या माध्यमातून अनेक चळवळी उभ्या राहत आहेत .अनेक उपजीविकेची साधने उपलब्ध होत आहेत. बचत गटांच्या माध्यमातून चांगले कार्य होत आहे असे उद्गार महिला आर्थिक विकास महामंडळाच्या संचालिका सौ. मीनाक्षीताई पाटील यांनी काढले.                                          येथील शिवाजी महाविद्यालयात महाराष्ट्र राज्य महिला आयोग मुंबई व प्रियदर्शनी शैक्षणिक बहुउद्देशीय ग्रामीण विकास महिला सेवाभावी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या प्रशिक्षण अभियानात सौ.पाटील बोलत होत्या. यावेळी कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या ट्रेनर अर्चना सोमानी, महिला आर्थिक विकास महामंडळ लातूरचे समन्वयक मन्सूर पटेल ,भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या अध्यक्षा उत्तराताई कलबुर्गे, बळीराम केंद्रे यांची होती .यावेळी पुढे बोलताना सौ. पाटील म्हणाल्या आपल्या महिला सक्षम झाल्या पाहिजेत .मुलींनी मोबाईल, इंटरनेट , व्हाट्सअप ,फेसबुक याचा वापर कसा करावा त्याचे फायदे काय आहेत, तोटे काय आहेत यावर सविस्तर मार्गदर्शन केले .या प्रशिक्षणासाठी महिला बचत गटाच्या 150 महिला तर उदगीर परिसरातील 140 मुलींनी सहभाग नोंदवला होता. हे प्रशिक्षण शिबिर 2 सत्रांमध्ये घेण्यात आले. या दोन्ही सत्रांमध्ये विविध मान्यवरांनी मार्गदर्शन करून त्यांना प्रशिक्षण दिले .या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ .सुरेश शिंदे यांनी तर आभार डॉ. रामकिसन मांजरे यांनी मानले.