पाथरी येथील ( कै. )माणीक केंद्रे यांच्या कुटुंबियास २११०० रुपयाची आर्थीक मदत
उदगीर तालुका पञकार संघाचा पुढाकार
उदगीर-: मुदगल (ता. पाथरी जि. परभणी ) येथील पाथरी तालुका मराठी पञकार संघाचे अध्यक्ष पञकार कै. माणिक केंद्रे यांच्या कुटुंबास उदगीर तालुका मराठी पञकार संघा तर्फे एकेविस हजार शंभर रुपयाची अर्थिक मदत सोमवारी (ता.२ ) त्यांच्या गावी जावुन मुलगा प्रसाद केंद्रे यांना देण्यात आली .
सेलु ( जि. परभणी ) येथे इंजनियरींगच्या शिक्षणासाठी मुलगा प्रसाद केंद्रे आई ,वडीला सोबत भाड्याच्या खोलीत राहत होते . राञीच्या वेळी स्वयंपाक घरात गाढ झोपेत असताना गॅस लिकीज होवुन स्पोट झाला यात पती पत्नी होरपळुन गेले होते. औरंगाबाद येथील बेंबडे हाॅस्पीटल मध्ये दोघांचाही उपचार चालु होता. माञ आर्थीक परिस्थिती हालाकीची असल्यामुळे दवाखान्याचा खर्च परवड नसल्यामुळे सासुरवाडी अकोला येथे हालवण्यात आले होते. शासनाच्या मदतीसाठी प्रयत्न करुनही आर्थीक मदत न मिळाल्यामुळे माणीक केंद्रे यांचा अखेर मुत्यु झाला. पत्नीचा उपचार आद्याप चालुच असल्यामुळे त्यांना आर्थीक मदतीची गरज असल्यामुळे पञकाराच्या संवेदना जागृत होवुन मदतीचे अवाहन करण्यात आले होते. यावेळी उदगीर येथील पञकारांनी जमेल तेवढी आर्थीक मदत जमा करुन देण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी एकेविस हजार शंभर रुपयाचा निधी जमा झाला. जमा झालेली रक्कम प्रत्यक्ष त्यांच्या गावी जावुन कुटुंबाकडे सुपुर्त करुन सात्वन केले.
यावेळी उदगीर तालुका मराठी पञकार संघाचे श्रीनिवास सोनी ,सचिन शिवशेट्टे , सुनिल हावा ,बबन कांबळे यांनी माणिक केंद्रे , दर्शन केंद्रे सोनपेठ तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष बाबासाहेब गर्जे , सिद्धेश्वर गिरी , मुदगलचे सरपंच लक्ष्मण केंद्रे , सायंस केंद्रे ,कृष्णा केंद्रे,पंढरी मुंडे उपस्थीत होते.