जयहिंदमध्ये विज्ञान प्रदर्शनास विद्यार्थ्यांचा उस्फूर्त प्रतिसाद
--
उदगीर, ता. 28 (बातमीदार) : येथील स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ संचलित जयहिंद पब्लिक स्कुलमध्ये शुक्रवारी (ता.28) राष्र्टीय विज्ञान दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
आजच्या दिवशी डॉ.सी.व्ही. रमण यांचा रमण इफेक्ट सिध्द झाल्याने भारतभरात २८ फेब्रुवारी हा राष्र्टीय विज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो. जयहिंद स्कुलमध्ये आयोजित विज्ञान प्रदर्शनाचे उदघाटन संस्थेचे शैक्षणिक संचालक संजय हट्टे,फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य गणेश तोलसरवाड, कनिष्ठच्या प्राचार्या मनोरमा शास्त्री,स्कुलचे उपप्राचार्य सतिष वाघमारे यांच्या उपस्थितीत झाले.
या विज्ञान प्रदर्शनात पहिली ते दहावी वर्गाच्या चारशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. १८६ विद्यार्थ्यांनी ४२ प्रयोग सादर केले, ९२ विद्यार्थ्यांनी ४६ रांगोळीतून व ११० विद्यार्थ्यांनी ३५ भित्तीपत्रकातून विषयांची मांडणी केली. प्रयोग सादर करण्यासाठी विज्ञान शिक्षक सविता बिरादार, पद्मजा मूर्ती, ओमप्रकाश दाजी, राहूल गायकवाड, अयाज झरकर, अंजना जगदाळे, वैशाली माटिगिरे, भाग्यश्री वंगवाड, मनिषा कांबळे, पूजा समगे, विम्मि मेनन, शितल वाघमारे, मंगल गरगटे, अरेना फोमई, भाग्यश्री सूर्यवंशी, दैवशाला दंतराव, लिव्हिंग स्टोन, ज्योती हैबतपूरे, पूजा पटवारी यांनी मार्गदर्शन केले.
मान्यवरांनी विद्यार्थ्यास प्रयोग कसा तयार केला? उपयोग काय?वापर कसा करावा? असे प्रश्न विचारुन माहिती घेतली. तर विद्यार्थ्यांनी सर्व प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देऊन प्रयोगाची पूर्ण माहिती दिली. प्रदर्शनाचाएक महेश शिंदे, महेश कस्तुरे, धोंडिबा शिंदे, सतिष पाटील, दयानंद टाकळे,अभिषेक मटिले,ज्योती स्वामी, निलेश बेलुरे, रत्नाकर मोरे, सोमनाथ झेरकुंटे यांच्यासह सर्व विभाग प्रमुख, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी लाभ घेतला.
Attachments area