प्रयोगातून अभ्यासल्या विज्ञानाच्या संकल्पना.....
प्रयोगातून अभ्यासल्या विज्ञानाच्या संकल्पना.....


 उदगीर : येथील लोकमान्य शिक्षण प्रसारक मंडळ उदगीर द्वारा संचालित, विवेकवर्धिनी प्राथमिक  विद्यामंदिर शाळेत बुधवारी  विज्ञान प्रदर्शन व शैक्षणिक साहित्य उपक्रम प्रदर्शन भरविण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक दादाराव दाडगे होते.

विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन पोस्ते पोद्दार इंग्लिश स्कूलचे प्राचार्य सूर्यकांत चवळे यांच्या हस्ते झाले. तर प्रमुख पाहुणे  म्हणून रामकृष्ण इंटरनॅशनल सीबीएसइ स्कूलचे प्राचार्य श्रीपाद सिमंतकर होते.

प्रारंभी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. तसेच विज्ञान प्रदर्शनाच्या दालनाचे फित कापून उद्घाटन करण्यात आले. यावेळी पहिली ते सातवीचे अश्विनी कोठावळे, मीना काळे, उद्धव हालसे , हनुमंत महाराज, प्रभाकर सूर्यवंशी, नागनाथ रकसाळे, प्रदीप महाजन, या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी तब्बल साठ प्रयोग सादर करून विज्ञानाच्या संकल्पना मांडल्या. या प्रयोगात कडधान्य, भाजीपाला, गणिताची सूत्रे इथपासून ते माठातील ए सी पर्यंत विविध बाबींचा समावेश होता. नागरिक व पालकांनी हे प्रदर्शन पाहण्यासाठी गर्दी केली होती. आजी-माजी विद्यार्थी प्रदर्शन but पाहण्यासाठी जमले होते.नागनाथ रक्षाळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश बिरादार यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रभाकर सूर्यवंशी यांनी मानले.