भाजी व फळ विक्रेत्यांना जि.प.मैदान येथे कोरोना काळात जागा उपलब्ध 

भाजी व फळ विक्रेत्यांना जि.प.मैदान येथे कोरोना काळात जागा उपलब्ध 


पत्रकारांनी घातले लक्ष म्हणून प्रशासन झाले दक्ष



उदगीर : देशात लॉकडाऊन असल्यामुळे उदगीर शहरामध्येही संचारबंदी लागू आहे. असे असले तरी अत्यावश्यक सेवा देणार्‍या यंत्रणेला सूट दिली आहे. संचारबंदीला नियंत्रित करण्यासाठी पोलिस प्रशासनाच्या वतीने अनावश्यक बाहेर फिरणार्‍या लोकांना भीती बसावी म्हणून, लाठीचार्ज केला जात होता. पण पोलिस प्रशासन संचारबंदीच्या नियमाचे पालन स्वत:च न करता सापडेल त्याला मारत होते. खरेतर जनतेला रस्त्यावर फिरत असताना थांबवून कारण विचारणे गरजेचे होते व आवश्यक कारण असेल तरच त्यास कामानिमित्त फिरण्यास सुट द्यावी अन्यथा समजावून सांगून वापस पाठवून द्यावे. युवा जर गाडीवर दोन किंवा तीघे फिरत असतील तर त्यांना थांबवून समजावून सांगणे किंवा त्यांच्या पालकांना बोलावून त्यांना एक वेळेस चांगले समज देणे ज्यामुळे पालकांनाही कळेल कि आपला मुलगा /मुलगी कोणासोबत विनाकारण फिरत आहे. यामुळे पालक ही दक्ष राहतील यामुळे पोलिसाांचा ताण कमी होईल. पण पोलिस प्रशासनाकडून फक्त मारत असल्यामुळे संपूर्ण राज्यभर पोलिसांवरची नाराज वाढली यामुळे शासनाने मारण्यासाठी पोलिसांना मज्जाव केला. पण याचे दुष्परिणाम उलटे झाले व लोक बिनधास्त रस्त्यावर मास्क न लावता फिरू लागले व चौका चौकात,रोडवर, रोजच्या बसण्याच्या ठिकाणी येऊन (पान ३ वर) बसू लागले. यामुळे कोरोना व्हायरस पसरण्यास सोपे होते.
दैनंदिन गरजेसाठी लोक बाहेर पडतात व वेळेच्या बंधनाच्या अफवेमुळे एकाच वेळी भाजी, किराणा,मेडिकल आदी ठिकाणी गर्दी करतात. यात मेडिकलवाल्यांकडून सेफ डिस्टंसची दक्षता घेण्यात येत आहे पण भाजी विक्रेरेते व किराणा दुकानात मात्र रोजच्या प्रमाणेच गर्दी व जवळ येऊन देवान घेवान चालू आहे. नगर पालिकेने २-३ मीटरच्या आंतराची आखणी करून देखील जनतेकडून व विशेष भाजीविक्रेत यांच्याकडून कसल्याच प्रकारचे पालन होत नाही. कारण भाजी मार्केटमध्ये होत असलेली गर्दीमुळे लॉकडाऊनचे नियम तोडत असलेले दिसत आहेत. 
यामुळे पत्रकारांनी दोन उदगीरमधील सर्वे करून प्रशासन व पोलिस प्रशासनास बातम्याच्या माध्यमातून निदर्शनास आणून दिले यामुळे प्रशासन जागी झाले व काल उपजिल्हाधिकारी, तहसीलदार,बी.डी.ओ.,मुख्याधिकारी यांची चर्चा झाली यावेळी पत्रकारांच्या माहिती देण्यात आली व प्रशासन दक्ष होऊन आजपासून भाजी मार्केटमधील सर्व भाजीचे हातगाडे हे जिल्हा परिषदेच्या मैदानावर ठरावीक अंतरावर थांबण्याची व्यवस्था करण्याचे निर्णय घेण्यात आला व याची माहिती तात्काळ भाजी विक्रेत्यांच्या अध्यक्षांना सूचना करून त्याचे काटेकोरपणे पालन करण्यास सांगीतले. ज पुन्हा भाजीमार्केटमध्ये भाजीच्या दुकाना ऐवजी एकही गाडा दिसला त्यावर कठोर कार्यवाही केली जाईल असे सांगण्यात  आले. यामुळे देगलूर रोड, बिदर रोड, नगर परिषेदच्या मागी बाजू, तहसील कार्यालयाच्या मागील बाजूचे लोकांना मार्केटमध्ये जाऊन गर्दी करण्याची वेळ येणार नाही. जिल्हा परिषदेचे मैदान मोठे असल्यामुळे भाजी विक्रेते व ग्राहक यांना सोयीचे जाईल व नियमाचे पालन सुध्दा केले जाईल. याच सोबत भाजीविक्रेते जर नांदेड बिदर रोड,देगलूर रोड, बिदर रोड, आडत लाईन मधील मोकळ्या जागेत, समता नगर, बिदर गेटच्या पलीकडे अशा ठिकाणी थांबा केले तर त्या त्या परीसरातील लोकांना लांब जाण्याची गरज नाही व भाजी विक्रेत्यांची जादा विक्री होईल.