९ मार्च पासुन सर्व शाळा सकाळच्या सञात
९ मार्च पासुन सर्व शाळा सकाळच्या सञात

जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचा आदेश  

 

उदगीर 

: नुकताच उन्हाळा सुरू झाला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील  जिल्हा परिषदेच्या प्राथमीक ,माध्यमीक शाळा , सर्व माध्यमांच्या खाजगी शाळा  दिलेल्या वेळापञका नुसार सकाळच्या सञात  भरवण्यात याव्यात असा आदेश जिल्हा परिषदेचे प्राथमीक शिक्षण अधिकारी यांनी परिपञकाद्वारे  दिले आहेत.

 

 तीव्र उन्हाळ्याच्या काळात पाणी टंचाई ,उन्हाची रखरखता पाहत  शाळा सकाळच्या सत्रात सुरू करण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी आधिकारी यांनी मान्यता दिली आहे. त्या नुसार जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने  परीपञक काढुन उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर   जिल्हा परिषद ,सर्व माध्यमाच्या खाजगी प्राथमीक,माध्यमिक शाळा सोमवार ते शुक्रवार सकाळी ८ ते १ तर शनिवारी सकाळी ७:३० ते ११:३०  या कालावधीत भरविण्यात याव्यात.असा आदेश  गटशिक्षण आधिकार्‍या मार्फत शाळेना दिला आहे.बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार नियोजित अध्यापनाच्या तासात कोणताही बदल केला जाणार नाही. याची काळजी वेळापञकात शिक्षण विभागाने घेतली आहे