उदगीर नगरपरिषद व एसटी महामंडळ यांच्या वादात बस स्थानकाचे काम रखडले.
राज्यमंत्री संजय भाऊ बनसोडे यांनी तात्काळ लक्ष घालने गरजेचे.
उदगीर नगरपरिषद व एसटी महामंडळ यांच्याबद्दल जनतेत तीव्र नाराजी. या बांधकामाचा उद्घाटन सोहळा 2019 मध्ये होऊन, देखील प्रत्यक्ष कामाला सुरुवात नाही. **संबंधितांकडून एक महिन्याच्या आत कामाला सुरुवात करण्याची आश्वासनांची खैरात.
उदगीर प्रतिनिधी....उदगीर नगर परिषद व उदगीर एसटी महामंडळ यांच्या बांधकामाचा टॅक्स भरण्याच्या वादातून बसस्थानकाचे काम रखडले असून, हे प्रकरण चव्हाट्यावर आले आहे. .2019 वर्षात तत्कालीन माजी आमदार माननीय, सुधाकरराव भालेराव यांच्या हस्ते उदगीर बसस्थानक नवीन इमारतीचे उद्घाटन सोहळा थाटामाटात संपन्न झाला. उदगीर करांच्या चेहऱ्यावर बसस्थानकाची जुनी इमारत ही इतिहासजमा होऊन नवीन इमारत होणार या मुळे सर्वांना आनंद वाटत होता. आता 2020 उजटले आहे. तरी परंतु नवीन बसस्थानकाच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात झाली नाही. याबाबत उदगीर आगाराचे मॅनेजर यांच्याशी चर्चा करून, माहिती घेण्यात आली. यावेळी नगरपरिषद उदगीर यांना बांधकाम परवान्यासाठी 39 लाख रुपये भरणे आहे. त्यासाठी नगर परिषदेकडून बांधकाम परवाना दिला जात नाही. आम्ही महामंडळ जनतेची दिवस-रात्र एसटी च्या माध्यमातून प्रवासाची सोय देत असतो. म्हणून उदगीर नगरपरिषदेने 39 लाख रुपयाची सूट देण्यात यावी अशी प्रतिक्रिया त्यांनी राजधर्म या वृत्तपत्रास बोलताना व्यक्त केली. एकंदरीत हे बसस्थानकाचे काम उदगीर नगरपरिषद व उदगीर बसस्थानक यांच्या वादाच्या भोवर्यात सापडलेले दिसून येत आहे. उदगीरला राज्यमंत्रिपद संजय भाऊ बनसोडे यांना मिळालेले आहे. तरी उदगीर करांची संजयभाऊ यांना अशी मागणी आहे की, या प्रकरणात तात्काळ लक्ष घालून, नगरपरिषद उदगीर व उदगीर बसस्थानक यांच्या वादात लक्ष देऊन बांधकामास सुरुवात करावी अशी जनतेची मागणी आहे.