वीरशैव लिंगायत वधू-वर मेळाव्याच्या स्मरणिकेचे प्रकाशन संपन्न
वीरशैव लिंगायत वधू-वर मेळाव्याच्या स्मरणिकेचे प्रकाशन संपन्न

 

उदगीर (ता.प्र.) लिंगायत महासंघ शाखा उदगीरच्या वतीने वीरशैव लिंगायत वधू- वर परिचय मेळावा २०२० च्या स्मरणिकेचे प्रकाशन शनिवार दि. २९ रोजी दूधिया हनुमान मंदिर येथे करण्यात आले.

वीरशैव लिंगायत वधू- वर परिचय मेळाव्याच्या या स्मरणकिचे प्रकाशन भारत लिबरल एज्युकेशन  सोसायटीचे अध्यक्ष  अँड.गुणवंतराव पाटील हैबतपुरकर यांच्या हस्ते करण्यात आले.  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लिंगायत महासंघाचे प्रांताध्यक्ष प्रा.सुदर्शन बिरादार होते. यावेळी लिंगायत महासंघाचे जिल्हासरचिटणीस चंद्रकांत  कालापाटील, तालूकाध्यक्ष अमरनाथ मुळे, शहराध्यक्ष सुभाष बिरादार, मेळावा प्रमुख  महादेव हरकरे, प्रभुराज कप्पीकेरे, तालुकाउपाध्यक्ष प्रा.राजेश्वर पाटील, चंद्रकला शेटकार, शांतवीर मुळे, शिवाजी स्वामी, परमेश्वर पटवारी, चंद्रकांत सिरसे, सुभाष शेरे, माधवराव  निंगदाळे, शिवराज तोंडारे, बापुराव शेटकार, सुशिल जीवने, भरत करेप्पा, अँड. मसलगे, प्रा. अश्विन हावा यांच्यासह पदाधिकारी, समाज बांधव व महिला उपस्थित होते. या स्मरणिका पुस्तिकेचे वाटप सुरु झाले असुन नाव नोंदणी केलेल्यांना मोफत मिळणार असून त्यांनी चंद्रकांत कालापाटील व  अमरनाथ मुळे यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन यावेळी करण्यात आले.ग