लाईफ केअर हॉस्पिटल ,उदगीर कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी सज्ज -संचालक -सुधाकर भालेराव
कोरोना एक जागतिक आरोग्य संकट आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत घाबरु नका. उदगीर आणि परिसरातील नागरिकांसाठी लाईफ केअर हॉस्पिटल अ‍ॅन्ड रिसर्च सेंटर कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी निष्णात तज्ञ डॉक्टर व कुशल कर्मचार्‍यांसोबत सज्ज आहे. आज घडीला उदगीर आणि परिसरात कोरोनाचा एकही रूग्ण नाही, हे आपल्यासाठी समाधानकारक असले तरी त्याचा मुकाबला करण्यासाठी आपण सज्ज राहीलेच पाहीजे. तेव्हा कोणालाही जर शंका आली तर तातडीने लाईफ केअर हॉस्पिटलच्या आपात्कालीन टिम सोबत तातडीने संपर्क साधा. मला काही होत नाही असे म्हणून कोणततेही लक्षण लपवू नका किंवा बेफिकिर राहू नका. लाईफ केअर हॉस्पिटलची संपूर्ण टिम आपल्यासाठी सज्ज आहे.

सोबतच देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी दि.22 मार्च रोजी घरीच राहण्याचे आवाहन केले आहे. हा जनता कर्फ्यु आपल्या निरामय आरोग्यासाठी आहे. त्यामुळे माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद द्या. सकाळी 7 ते रात्री 9 पर्यंत घरीच रहा. कोरोनावर मात करण्यासाठी डॉक्टरांच्या सुचनांचे पालन करा. सरकार करीत असलेल्या उपाय योजनांना प्रतिसाद द्या. दि. 22 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजता कोरोनाशी लढणार्‍या सर्व विभागातील कर्मचार्‍यांना आभार व्यक्त करण्यासाठी केलेल्या आवाहनानुसार आपापल्या घरापुढे उभे राहून टाळ्या वाजवा, घंटा वाजवा आणि आभार व्यक्त करा. आपल्यासाठी कोरोनाशी संबंधीत शेकडो विभाग आणि पोलिस, आरोग्य, सफाई क्षेत्रातील लाखो लोक रात्रंदिवस झटत आहेत, त्यांचे आभार माननण्याची गरज आहे. आज या क्षणाला मनापासून मी सर्व अधिकारी व कर्मचार्‍यांचे आभार व्यक्त करीत आहे. 

लाईफ केअर हॉस्पिटल अ‍ॅन्ड रिसर्च सेंटर उदगीर येथे कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज आहे. कोणत्याही परिस्थितीत घाबरु नका, घराबाहेर पडू नका, काम असेल तरच बाहेर पडा. एखादी आपात्कालीन आरोग्य परिस्थिती निर्माण झाली तर मोफत अ‍ॅम्बुलन्स, डॉक्टर, स्टाफ आपल्यासाठी सज्ज आहे. तातडीने हेल्पलाईनवर कॉल करा. आपल्यासेवेत लाईफ केअर हॉस्पिटल अ‍ॅन्ड रिसर्च सेंटर तत्पर आहे. तुमच्यावर कोणतेच संकट येवू नये, तुम्हाला निरामय आरोग्य लाभावे हीच माझी शुभेच्छा आहे. तरीही दूर्दैवाने कोणतेही संकट ओढवले तर तातडीने लाईफ केअर हॉस्पिटल अ‍ॅन्ड रिसर्च सेंटर टीम सोबत अथवा माझ्याशी संपर्क साधा !

- सुधाकर भालेराव,  माजी आमदार, तथा संचालक लाईफ केअर हॉस्पिटल अ‍ॅन्ड रिसर्च सेंटर  उदगीर .9769485169