साई बार उदगीर येथे एकास मारहाणप्रकरणी  आरोपीवर ऍट्रासिटी गुन्हा दाखल





साई बार उदगीर येथे एकास मारहाणप्रकरणी  आरोपीवर ऍट्रासिटी गुन्हा दाखल

उदगीर(प्रतिनिधी) - दि. १० मार्च २०२० रोजी उदगीर येथील बिदर रोडवरील साई बार येथे सायं. ७ वाजता पैशाच्या देवाणघेवाण वरून आरोपीतर्फे फिर्यादी जय भारत उपाध्ये रा.गांधी नगर यास जब्बर मारहाण करण्यात आली असून आरोपींवर उदगीर शहर पोलिस स्टेशन येथे गु.र.नं.८६/२०२० कलम ३२४,३२३,५०४,३२ भाजवी व सह कलम ३(१)(आर)(एस) अ जा.ज.प्र. कायद्यानुसार ऍट्रासीटीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहेत. 
उदगीर येथील बिदर रोडवरील साई बार येथे दि.१० मार्च २०२० रोजी सायं. ७ वा. जय भारत उपाध्ये वय २२ वर्,े रा.गांधीनगर,उदगीर हा मित्राकडे पैसे आणण्यासाठी गेला असता आरोपी विशाल विजयकुमार पाटील, धिरज विजयकुमार पाटील व गणेश यांनी संगणमत करून फिर्यादीचे मीत्रास इकडे व म्हणून टेबलाजवळ बोलावून तु कुठला आहेस म्हणून मारहाण करण्यास सुरुवात केली तेंव्हा फिर्यादी जय भारत उपाध्ये यांनी माझ्या मित्राला का मारता अशी विचारणा केली असता आरोपींनी तु कोण आहेस म्हणून आरोपींनी फिर्यादीस मांगा म्हाराचे तुमचे काय औकात आहे म्हणून जातीवाचक शिवीगाळ करून लाथा बुक्याने व काठीने मारहान केली अशी फिर्यादीच्या तक्रारीनुसार उदगीरचे उपविभागीय पोलीस अधिकारी मधुकर जवळकर यांनी गु.र.नं.८६/२०२० कलम ३२४,३२३,५०४,३२ भाजवी व सह कलम ३(१)(आर)(एस) अ जा.ज.प्र. कायद्यानुसार ऍट्रासीटीचा गुन्हा नोंद केला आहे. यामध्ये एकास अटक करण्यात आली असून दोन आरोपी अद्याप फरार आहे. पोलिसांच्या वतीने पुढील तपास सुरु आहे.