80 वर्षे वयाचे असून सुद्धा त्यांनी महापालिकेत स्वतःहून येऊन आपल्या घरपट्टी भरली
80 वर्षे वयाचे असून सुद्धा त्यांनी महापालिकेत स्वतःहून येऊन आपल्या घरपट्टी भरली

 

लातूर*:- शहर गावभागातील बागनभाई गल्ली येथील 80 वर्ष वयापेक्षा जास्त वयाचे वयोवृद्ध इब्राहिम मोहम्मद शेख व त्यांची बायको हे दोन्ही महापालिकेत आपली घरपट्टी भरण्यासाठी आले होते. त्यांना पालिकेत येऊन काही पण समजत नव्हते त्यावेळेस महाराष्ट्र जन एकता संघटना चे संस्थापक अध्यक्ष इरफान शेख यांनी स्वतः त्यांना पालिकेच्या हॉलमध्ये घेऊन जाऊन उपमहापौर बिराजदार साहेब यांना खाली हॉलमध्ये बोलावून त्यांच्या समोरासमोर त्यांना सांगितले की एवढे वयस्क वृद्ध माणूस हे चालत येऊन पालिकेत घरपट्टी भरण्यासाठी आले व त्या झोनचे अधिकारी हे कुठे आहेत.

 

 व गोरगरिबांच्या प्रश्नांची जाणीव असलेला आणि त्यांच्या कामासाठी नेहमीच धावून जाणारे असे लातूरचे उपमहापौर चंद्रकांत बिराजदार साहेब हे स्वतः खाली येऊन त्यांची विचारपूस करून घरपट्टी भरणा करून घेतले व गाव भागातील अधिकारी यांना त्यांनी फोन लावून उपमहापौर साहेब यांनी त्यांची झडती घेतली. एवढे 80 वर्षे वयाचे असून सुद्धा त्यांनी महापालिकेत स्वतःहून येऊन आपल्या घरपट्टी भरली त्यांचे आदर्श घेऊन लातूर शहरातील समस्त नागरिकांनी आपापल्या घरची घरपट्टी भरावी व लातूरच्या विकासाला हातभार लावावा असे उपमहापौर बिराजदार साहेब यांनी आव्हान केले.