अखिल भारतीय अंतर विद्यापीठ राष्ट्रीय तायक्वांडो महिला स्पर्धेत शिवाजी महाविद्यालयाच्या खेळाडू चा समावेश  

अखिल भारतीय अंतर विद्यापीठ राष्ट्रीय तायक्वांडो महिला स्पर्धेत शिवाजी महाविद्यालयाच्या खेळाडू चा समावेश अखिल भारतीय अंतर विद्यापीठ राष्ट्रीय तायक्वांडो महिला स्पर्धेत शिवाजी महाविद्यालयाच्या खेळाडू चा समावेश    
पंजाबी युनिव्हर्सिटी पतियाळा पंजाब येथे आयोजित अखिल भारतीय अंतर विद्यापीठ तायक्वांडो महिला स्पर्धेत  येथील शिवाजी महाविद्यालयाची खेळाडू  कु.जवळे सुवर्णा सुभाष  बी.कॉम.प्रथम वर्ष  या खेळाडूनी कौशल्याच्या आधारावर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड च्या संघाचे प्रतिनिधित्व केले .जवळे सुवर्णा या खेळाडूने अनेक राज्यस्तरीय स्पर्धेत सहभाग नोंदवलेला असून महाविद्यालयाच्या नाव लौकिकात भर टाकली आहे.
विविध राष्ट्रीय खेळामध्ये सहभाग नोंदवून असे खेळाडू खेळाची संस्कृती जोपासत आहेत.त्या मुळे महाविद्यालयाची ओळख खेळ संस्कृती जोपासणारे महाविद्यालय अशी झालेली आहे.खेळांची विजयी परंपरा असलेल्या या महाविद्यालयात खेळाडूंना नेहमी खेळांसाठी प्रोत्साहित केले जाते .महाविद्यालय मार्फत खेळाडूंना विविध सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात.
खेळाडूंना नेहमी प्रोत्साहित करणारे किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा.श्री.प्रा.विजयकुमार पाटील शिरोळकर,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.व्ही
ए.जाधव ,उप प्राचार्य डॉ.एल.एच.पाटील ,डॉ.एस.व्ही.जगताप ,डॉ.आर.एम.मांजरे ,कनिष्ठ महाविद्यालयाचे        उप प्राचार्य आर.जी.जाधव , पर्यवेक्षक प्रा.धनगे एस.एस. शिक्षकवृंद व कर्मचारी खेळाडू यांनी खेळाडूचे अभिनंदन केले . क्रीडा संचालक नेहाल अहेमद  व गजानन माने यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले.