घराचे कुलुप तोडून १ लाखापर्यंतचे सोने व रोख रक्कम चोरीला
घराचे कुलुप तोडून १ लाखापर्यंतचे सोने व रोख रक्कम चोरीला

उदगीर(प्रतिनिधी)- उदगीर येथील व्यापारी संपत कुमारजी हिरालाल लोया यांच्या शिवनगर कॉलनी,बिदर रोड उदगीर येथील राहत्या घराचे कुलुप तोडून घरातील ४५ हजाराचे सोने व ५१ हजाराचे रोख रक्कम चोरली गेली आहे. यानुसार उदगीर शहर पोलिस स्टेशन येथे अज्ञात चोरा विरूध्द ३८० भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संपत कुमारजी हिरालाल हे शिवनगर कॉलनी,बिदर रोड,उदगीर  येथील रहिवाशी असून ते उदगीर येथील प्रसिध्द व्यापारी आहेत. त्यांच्या तक्रारी अर्जानुसार दि.७ मार्च २०२० रोजी दुपारी ४ वा. त्यांच्या कुटुंबासोबत देवदर्शनासाठी तिरूपती बालाजी येथे घाराला कुलुप लावून गेले होते. देवदर्शन घेऊन दि.११ मार्च २०२० रोजी सकाळी ११.१५ वा. घरी आले व घराचे वालकम्पाऊंडचे नेटचे कुलुप उघडून घरी गेले असता तेथे त्यांना घराचे खालचे दवाज्याचे कुलुप तोडलेले दिसले व पहिल्या मजल्यावर जाऊन पाहिले असता तेथील घराचे दराराचे कुलुप तोडलेले दिसले त्यावेळी त्यांनी पत्रकार श्रीनिवास सोनी व शेजार्‍यांना बोलावून घराची पाहणी केली असता त्यांच्या तळघराचे कुलुप तोडलेले दिसले व आतमध्ये सामान अस्तव्यस्त पडलेले होते व पहिल्या मजल्यावरच्या दाराचेही कुलुप तोडलेले होते व घरातील लाकडी कपाटाचे सेल्फ लॉक तोडून कपाटातील सामान अस्त व्यस्त फेकले दिसले व कपाटतील डेक्सचे तिजोरीमध्ये ठेवलेले सोन्याचे एक तोळ्याची,अर्ध्या तोळ्याची अशा दोन अंगुठ्या एकूण अंदाजीत रू.४५ हजार व रोख रक्कम ५१ हजारा रूपय असे एकूण रू.९६ हजाराची अज्ञात चोराने घराचे कुुलुप तोडून चोरून नेले आहे.
याप्रमाणे उदगीर शहर पोलिस स्टेशन येथे कलम ४५७, ४५४ ३८०भादवी प्रमाणे अज्ञात चोरा विरूध्द गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास एपीआ गायकवाड यांच्याकडे देण्यात आला आहे. पुराव्यासाठी घरातील सी.सी.टि.व्ही कॅमाराचे स्टे.डा.क्र.७१/०२० इ.ंन.३४ वेळ १८४० वा. भाग १ ते ५ फुटेज देण्यात आले आहे.