*विद्यार्थ्यांना डिजिटल शाळेच्या माध्यमातून गुणवत्ता मिळवून देणाऱ्या शिक्षकांच्या पाठीशी ठाम उभा* ----
जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल भैया केंद्रे
उदगीर ( प्रतिनीधी ) --- डिजिटल शाळा उद्घाटन सोहळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चोंडी, तालुका उदगीर येथील कार्यक्रमात उद्घाटक म्हणून राहुल केंद्रे बोलत होते,
आजच्या युगामध्ये डिजिटल ज्ञान घेणे अतिशय आवश्यक असून आज एलईडी टीव्हीच्या माध्यमातून चोंडी ही संपूर्ण शाळा डिजिटल होत आहे याचा मला मनस्वी आनंद होत असून जिल्हा परिषदेच्या शिक्षकांमध्ये गुणवत्ता ठासून भरलेली आहे त्याचा त्यांनी सदुपयोग करून विद्यार्थ्यांना गुणवंत होण्यासाठी मार्गदर्शन करावे मी कायम जिल्हा परिषदेच्या गुणवंत शिक्षकांच्या पाठीशी ठाम उभा आहे असे प्रतिपादन राहुल केंद्रे यांनी केले .
या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून विनायक रावजी जिंकलवाड साहे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष जि प प्रा शाळा चोंडी तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून नळगीर गटाचे जिल्हा परिषद सदस्य बसवराज पाटील कोळखेडकर ,उदगीर चे उपजिल्हाधिकारी प्रविणजी मेंगशेट्टी ,उदगीर पंचायत समितीचे सभापती विजयकुमार पाटील, उदगीरचे तहसीलदार व्यंकटेश मुंडे , चोंडी च्या सरपंच अनुसया ताई पवार ,उपसरपंच राजकुमार चिट्टे, कोदळीचे केंद्रप्रमुख शिवशंकर जी पाटील चोंडी चे ग्रामसेवक भीमराव महाडोळे आणि व जि प प्रा शा चोंडीचे मुख्याध्यापक मनोहर केरबा पाटील आदी उपस्थित होते सूत्रसंचालन श्री गायकवाड सर यांनी केले तर आभार प्रदर्शन शाळेचे मुख्याध्यापक मनोहर पाटील यांनी मानले