राज्यमंत्री मा.संजय बनसोडे यांचा प्रा. प्रदीप वीरकपाळे  परिवाराच्या वतीने भव्य सत्कार संपन्न
राज्यमंत्री मा.संजय बनसोडे यांचा प्रा. प्रदीप वीरकपाळे  परिवाराच्या वतीने भव्य सत्कार संपन्न


 महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण, पाणीपुरवठा अशा एकूण आठ खात्याचे राज्यमंत्री असलेले एक कर्तबगार राज्यमंत्री मा. संजय बनसोडे यांचा किंग ऑफ केमिस्ट्री म्हणून ओळखले जाणारे श्री. रत्नगंगा केमिस्ट्री क्लासेसचे संचालक प्रा.प्रदीप वीरकपाळे व त्यांच्या परिवाराच्या वतीने सन्मानचिन्ह, शाल व पुष्पहार देऊन भव्य सत्कार करण्यात आला. 

                    यावेळी वीरशैव लिंगायत समाजाचे अध्यक्ष मा.चंद्रकांतआण्णा वैजापुरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मा.सिध्देश्वर उर्फ मुन्ना पाटील, पी.टी.ए. चे राज्य उपाध्यक्ष प्रा.गोपाळकृष्ण घोडके, रा. कॉ. सेवादलाचे प्रदेश उपाध्यक्ष मा.नवनाथ गायकवाड, न.प.चे माजी उपनगराध्यक्ष मा.शिवराज पाटील, श्री क्षेत्र महादेव मंदिराचे अध्यक्ष श्रीकांत पाटील, संग्राम वीरकपाळे, मनोहर आडे, दिलीप वीरकपाळे, सतीश वीरकपाळे, राजकुमार कपाळे,अरुण फुलारी, म.ब.परिषदेचे जिल्हा अध्यक्ष कुणाल बागबंदे, बबलू रंगवाळ, रमेश वीरकपाळे, अमर चिंचोळे, विश्वनाथ पाटील, प्रमोद कामण्णा, काशिनाथ बाळे, आकाश बिरादार, प्रा.रामचंद्र बिरादार, प्रा.पांडुरंग फड, प्रा.संतोष चौधरी, प्रा.सोमनाथ बिराजदार, प्रा.संजय जामकर, प्रा.राजकुमार बिरादार, प्रा.सिद्राम शेटकार, प्रा.राजेय कुलकर्णी, राजेंद्र पटवारी पिंपरीकर, अमोल बिरादार इत्यादी मान्यवर उपस्थित होते. या वेळी वीरकपाळे परिवाराच्या वतीने चि. द्रोणा प्रदीप वीरकपाळे यांनी बनसोडे साहेबांचे, वैजापुरे आण्णाचे व मुन्ना पाटील साहेबांचे  बहारदार चारोळ्याच्या माध्यमातून स्वागत करून उपस्थिताच्या टाळ्या मिळवून मनेही जिंकून घेतली.या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन इच्छापूर्ती कोचिंग क्लासेसचे संचालक प्रा.सिध्देश्वर पटणे यांनी केले. या कार्यक्रमास कपाळे गल्ली, भोई गल्ली, फुलारी गल्ली तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.