मानवी एकात्मता केंद्रित होण्यासाठीच शिवपूजा
डॉ. शिवलिंग शिवाचार्य यांचे मत
उदगीर, ता. 21 (बातमीदार) : मानवी मनाची एक आखडतात केंद्रित होण्यासाठी शिवपूजा केली जाते.शिवरात्रीनिमित्त केलेली पूजा आत्मिक समाधान देते. महादेवाच्या भक्तीमुळे मानवी जीवनाचे कल्याण होते असे मत डॉ शिवलिंग शिवाचार्य यानी व्यक्त केले.
तोडार (ता.उदगीर) येथील खोरी महादेव मंदिरात शुक्रवारी (ता.21) महाशिवरात्रीनिमित्त आशीर्वचन कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी माजी आमदार मनोहर पटावरी, सत्संग मंडळाच्या अध्यक्षा शीलाताई मालोदे, नागनाथ मालोदे, खुशाल खिंडे, राजकुमार शेटेप्पा, आनंदराव मालोदे, माधव पाटील, संजय मालोदे आदी यावेळी उपस्थित होते.
वेळी डॉ शिवाचार्य म्हणाले जीवनात यशस्वी होण्यासाठी सत्संगाचे सानिध्य आवश्यक आहे. शिवरात्र ही शिवभक्तांसाठी महापर्वणी असते.या दिवशी केलेली शिवाची भक्ती व पूजा ही जीवनात आनंद निर्माण करणारी ठरते. मानवी मनाच्या एकाग्रतेसाठी शिवपूजा महत्त्वाची असते त्यातून देव, धर्म व देश यांची भक्ती वृद्धिंगत होत असते.
सर्वांना सामावून घेण्याची शक्ती ही लिंगायत धर्मात आहे. या धर्मात सर्वांना स्वीकारले जाते. श्रीमंतातील श्रीमंतांना व गरीबातील गरिबांना सामावून घेणारा हा धर्म आहे. मात्र या धर्मातील मुख्य प्रश्न राजदरबारी सुटत नसल्याने सर्वांना सामावून घेणाऱे लिंगायत अडचणीत आले आहेत. लिंगायत धर्म मूलनिवासी धर्म आहे. त्यासाठी एकत्र येऊन काम करण्याची गरज असल्याचे डॉ. शिवाचार्य यांनी यावेळी व्यक्त केले.
--
चौकटीत- विकासासाठी एकजुट आवश्यक...
लिंगायत धर्माला स्वतंत्र धर्म मान्यता मिळायची असेल व लिंगायतांचा विकास हवा असेल तर सर्वांनी एकजूट होणे आवश्यक आहे. जोपर्यंत एकजुटीचा लढा एकसंघ उभारणार नाही तोपर्यंत धर्म मान्यता व लिहिण्याचा त्यांचा विकास होणार नसल्याचे यावेळी डॉ शिवाचार्य यांनी सांगितले.