वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी इंदोरीकर महाराजांना दिलासा

इंदोरीकर महाराजांच्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी अहमदनगरच्या(पीसीपीएनडीटी) समितीने सायबर सेलकडे केली होती. सायबर सेलने या प्रकरणाची तपासणी करून सदरील व्हिडीओ युट्युबवर उपलब्ध नसल्याचे दिलेल्या अहवालात म्हंटले आहे.
नेमकं काय आहे प्रकरण
इंदोरीकर महाराजांनी 'स्त्री संग सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते आणि स्त्री संग अशीव वेळी झाला तर होणारी संतती रांगडी, बेवडी आणि खानदान मातीत घालणारी होते.' असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्याप्रकरणी मोठं वादळ निर्माण झाले होते. विविध पुरोगामी संघटनांनी इंदोरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली हाती.