महाराष्ट्र वीज निवृत्त ज्येष्ठ नागरिक संघ प्रदेश कार्यकारिणीची शुक्रवारी बैठक






महाराष्ट्र वीज निवृत्त ज्येष्ठ नागरिक संघ प्रदेश कार्यकारिणीची शुक्रवारी बैठक

 

उदगीर /  प्रतिनिधी -महाराष्ट्र वीज निवृत्त ज्येष्ठ नागरिक संघ व संघटना शाखा उदगीर ( संलग्न भारतीय मजदूर संघ ) शाखेच्या वतीने ( दि.२८ )  फेब्रुवारी वार शुक्रवार रोजी सकाळी ठिक १०: ०० वाजता, वृदांवृन गार्डन, नादेंड-बिदर रोड, माळेवाडी रस्ता, उदगीर, जि.लातूर येथे प्रदेश कार्यकारिणीची बैठक आयोजित केली आहे. 

या बैठकीत राज्य प्रदेश कार्यकारिणीचे के.पी.राऊत, भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस प्रभारी रविंद्र देशपांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत योग्य मार्गदर्शन केले जाणार आहे.तसेच दुपारी ठीक दोन वाजता राज्यातील व लातूर जिल्हयातील सर्वांना या बैठकीत विद्युत मंडळातील सेवानिवृत्त कर्मचारी, अधिकारी यांचे प्रलंबित प्रश्नाबाबत व पुढील आंदोलनाची दिशा ठरविणे, नियोजन करणे इत्यादी प्रश्नांसंबंधी चर्चा होणार आहे. या बैठकीस लातूर जिल्ह्यातील सेवानिवृत्त एम.एस.ई.बी.( जुनी ) , तथा नवीन महावितरण, महापारेषण व महानिर्मितीतील सर्व कर्मचारी , अधिकारी यांनी उपस्थित रहावे असे आव्हान उदगीर शाखाअध्यक्ष मोहन रामराव नायगांवकर, सेवानिवृत्त अतिरिक्त कार्यकारी अभियंता जी.जे.नळगीरकर, सेवानिवृत्त सहायक अभियंता बी.सी.पटणे, मुख्य लिपिक के.बी.पाटील यांनी केले आहे.


 

 



 



 















ReplyForward