मराठा आरक्षणाला स्थगिती नाही!

मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत आरक्षण देण्याच्या कायद्यास स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी नकार दिला. मराठा आरक्षणाच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱया याचिकांवर 17 मार्चपासून पुढील सुनावणीला सुरुवात करण्यात येणार असल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
राज्य सरकारने शिक्षण आणि शासकीय नोकऱयांमध्ये मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. राज्य सरकारच्या या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आक्हान देण्यात आले होते. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाने यासंबंधातील याचिका फेटाळून लावली. या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर झालेल्या सुनावणीच्या वेळी मराठा आरक्षणाच्या निर्णयास स्थगिती देण्याचा अंतरिम आदेश देता येणार नसल्याचे स्पष्ट केले.