उदगीरातील करोडागिरी नाक्यावरील अतिक्रमण विरोधात धरणे आंदोलन
उदगीर (प्रतिनिधी)-उदगीर शहरात अनेक ठिकाणी शासकिय व खाजगी जमीनीवर कब्जा करत भुमाफियांनी जमीन बळकावल्या असून पुन्हा येथील सर्व्हे.क्र.३४१/२ करोडगीरी नाका या शासकीय २० गुंठे जमीनीवर भुमाफियांनी बेकायदेशीरपणे कब्जा केला असून त्याविरोधात डा.बाबासाहेब आंबेडकर चारीटेबल ट्रस्ट या सामाजिक संघटनेच्या वतीने उपजिल्हाधिकारी यांच्या कार्यासमोर दि.५ फेब्रुवारीपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरु आहे.
उदगीर येथील मलगे दालमील शेजारील मोकाच्या ठिकाणी आसलेल्या सर्व्हे.क्र.३४१/२ मधील करोडगीरी नाका या शासकिय २० गुंठे जमीनीवर कांही आज्ञात व्यक्तीने ताराचे कंपाऊंड ओढले असल्याचा पंचमाना महसूल विभागाने केला आहे. तरी या भुमाफियांने केलेले बेकायदेशीर अतिक्रमण त्वरीत काढुन त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करावी,व त्या ठिकाणी करोडागिरी नाका सरकारी जमीन अशी पाटी लावावी या मागणीसाठी डा.बाबासाहेब आंबेडकर चारीटेबल ट्रष्ट या सामाजिक संघटनेचे मनोहर गायकवाड,मोहन वाले,मारोती तलवाडक,बाबासाहेब सुर्यवंशी, गंगाधर गायकवाड ,आदिंनी दि.५ फेब्रुवारी पासून उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरु केले असून आज तिसरा दिवस आहे.