खाजगीकरण म्हणजे, जखम पायाला व पट्टी डोक्याला - प्रकाश डबरासे
लोकांची क्रयशक्ती (purchasing power) वाढविल्याशिवाय, देशातील आर्थिक मंदी दूर होणे, तसेच डॉलरच्या तुलनेत रुपया सुदृढ (strong) होणेही शक्य नाही. आर्थिक मंदीचे खरे कारण, लोकसंख्येच्या प्रमाणात रोजगार निर्मिती न होणे, रोजगारात सातत्य व स्थर्य नसणे, तसेच शेतीपूरक उद्योगांची कमतरता असणे, हे आहे. करिता, आर्थिक मंदी दूर करण्यासाठी, रोजगार निर्मिती व रोजगारात सातत्य व स्थैर्य, तसेच शेती पूरक उद्योगांची निर्मिती करणे हेच उपाय आहेत, सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांचे खाजगीकरण करणे, हा उपाय होऊच शकत नाही. तसेच, हा उपाय अत्यंत घातक आहे. खाजगीकरण म्हणजे, " जखम पायाला व पट्टी डोक्याला", अशातला प्रकार आहे.
खाजगीकरणाच्या माध्यमातून, कल्याणकारी संविधानिक अर्थव्यवस्थेला (कलम ३९सी) मोडकळीस काढून, शोषणयुक्त व शोषण पूरक अर्थ व्यवस्था देशावर लढण्याचे काम चालू आहे.
देशाला आज कृतिशील संविधान प्रेमींची व रक्षकांची गरज आहे, वर वर दिखावा करणाऱ्या वांझोट्यांची नाही. देशातील सर्व शोषित, पिढीत व वंचित समाज घटकांनी, भावनात्मक ( emotional) व अनुत्पादक (counter productive) आंदोलनात गुंतून न राहता, खाजगीकरण विरोधात लढा उभारण्याची नितांत गरज आहे. अन्यथा, भारत पुन्हा गुलाम होऊन, आपले व आपल्या मुलाबाळांचे भविष्य अंधकारमय झाल्याशिवाय राहणार नाही.
- प्रकाश डबरासे,
बंधुत्व मिशन,
(व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्र एकतेसाठी