स्वामी विवेकानंदमध्ये 'नॅक'वर कार्यशाळा





स्वामी विवेकानंदमध्ये 'नॅक'वर कार्यशाळा


  उदगीर(प्रतिनिधी) येथील स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वामी विवेकानंद महाविद्यालयात नॅकवर कार्यशाळा नुकतीच संपन्न झाली.

   या कार्यशाळेचे मार्गदर्शक म्हणून शिक्षणतज्झ व युजीसी कमिटीचे सदस्य डॉ.एन.एस.धर्माधिकारी होते तर मंचावर संस्थेचे अध्यक्ष डॉ.सुधीर जगताप,शैक्षणिक संचालक संजय हट्टे,कार्यशाळेचे निमंत्रक महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.भिमाशंकर कोडगे यांची प्रमुख उपस्थिती होती.

   यावेळी मार्गदर्शन करताना डॉ.धर्माधिकारी म्हणाले,यापुढे महाविद्यालये चालवायची असल्यास युजीसीने ठरविल्याप्रमाणे महाविद्यालयाने नॅक करुन घेणे आवश्यक आहे.  नॅक करण्यासाठी सर्वप्रथम नॅक कमिटीला नेमके काय अपेक्षित आहे हे समजून घेऊन आपण करीत असलेले कार्य योग्य दिशेने करण्याची गरज असल्याचे सांगितले.

  डॉ.जगताप यांनी,धर्माधिकारी सरांच्या मार्गदर्शनाचा आम्हाला नॅकला सामोरे जाण्यासाठी नक्कीच फायदा होणार असल्याचे सांगितले.

  डॉ.कोडगे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

  या बैठकीस फ्लोरेन्स नर्सिंग महाविद्यालयाचे प्राचार्य नागसेन तारे,स्वामी विवेकानंद नर्सिंग महाविद्यालयाच्या उपप्राचार्या ज्योती स्वामी, प्रा.परशुराम पाटील,प्रा.बालाजी गायकवाड, प्रा.राशेद दायमी, प्रा.आसिफ दायमी,प्रा.पूजा बिरादार, प्रा.हनमंत सुर्यवंशी,प्रा.शाहूराज किंवडे,प्रा.कैलास कांबळे, प्रा.बालाजी सकनुरे,प्रा.प्रिंसी ओमेन,प्रा.अश्विनी शिंदे, प्रा.लक्ष्मी गायकवाड,ग्रंथपाल अर्चना देशमुख,अमोल भाटकुळे, प्रदीप पाटील,महेश कदम, सुरेश पवळे यांची उपस्थिती होती.


 

 




 

Attachments area