दिनांक २१ /०२ /२०२० रोजी येथे महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम, पर्यावरण, पाणीपुरवठा व स्वच्छता, भुकंप व पुनर्वसन, रोजगार हमी राज्यमंत्री मा. ना. श्री. संजय बनसोडे साहेब यांनी भेट देऊन पाहणी केली. व सर्व सामान्य नागरिक यांना आरोग्य सेवा तत्परतेने मिळाली पाहिजे. व उपलब्ध सोयीसुविधाची पाहणी करून आढावा घेतला. रूग्णांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळण्यासाठी जे काही यंञणा लागेल ते आपण देण्यासाठी कटीबध्द आहोत असा मा. मंञीमहोदयानी शब्द दिला. यावेळी डॉ. अशोक थोरात साहेब, डॉ. पवार साहेब, डॉ. देशपांडे साहेब, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री. मुन्ना पाटील साहेब, जि. प. चे. माजी सभापती श्री. कल्याणजी पाटील साहेब, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे युवक जिल्हाध्यक्ष श्री. विजय भैय्या निटुरे साहेब, श्री. प्रा. श्याम डावळे सर, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
शासकीय रुग्णालय उदगीर