शिवाजी महाविद्यालयाने गुणवत्ता जपली-केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे पाटील     
शिवाजी महाविद्यालयाने गुणवत्ता जपली-केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे पाटील     


  उदगीर —शैक्षणिक संस्थांमध्ये राजकारण नसावे. राजकीय वातावरण जर शैक्षणिक संस्थांमध्ये आले तर संस्था ज्या उद्देशाने उभ्या केल्या त्या उद्देशाने चालू शकत नाहीत. शिवाजी महाविद्यालय चालवणारी संस्था कोणतेही राजकारण करत नसल्यामुळे त्यांनी गुणवत्ता जपली .सुवर्णमहोत्सव साजरा करण्याची संधी त्यांना मिळाली असे उद्गार ग्राहक संरक्षण ,अन्न व नागरी पुरवठा केंद्रीय राज्यमंत्री भारत सरकारचे रावसाहेब दानवे पाटील यांनी काढले.                                                    येथील शिवाजी महाविद्यालयाने  आयोजित केलेल्या सुवर्ण महोत्सवाच्या समारोप समारंभाच्या वेळी ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.विजयकुमार पाटील शिरोळकर अध्यक्ष किसान शिक्षण प्रसारक मंडळ उदगीर तर प्रमुख उपस्थिती खासदार राज्यसभा अमर साबळे, मा. खासदार सुधाकर शृंगारे ,आमदार तथा माजी मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर ,मा.गोविंदराव केंद्रे प्रदेश उपाध्यक्ष भाजपा,मा. शिवाजीराव पाटील कव्हेकर माजी आमदार ,मा.गणेश दादा हाके,मा. रामचंद्र तिरुके ,मा.सौ.मीनाक्षीताई विजयकुमार पाटील ,मा.ज्ञानदेवराव झोडगे ,सचिव किसान शिक्षण प्रसारक मंडळ उदगीर,मा. श्रीरंगराव पाटील कोषाध्यक्ष किसान शिक्षण प्रसारक मंडळ, संस्थेचे सर्व कार्यकारिणी सदस्य , प्राचार्य डॉ. विनायकराव जाधव यांची होती. यावेळी पुढे बोलताना दानवे म्हणाले किसान शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना गोरगरीब सीमाभागातील मुला मुलींच्या शिक्षणासाठी झाली .अगदी त्याच पद्धतीने सुवर्णमहोत्सवी वर्षापर्यंत महाविद्यालयाची वाटचाल राहिली. यावेळी खासदार अमर साबळे,  माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर,प्रदेश उपाध्यक्ष भाजपा गोविंदराव केंद्रे  ,आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर ,खास��

[26/02, 8:55 PM] P. N R Jawale: ,खासदार सुधाकर श्रंगारे यांनी आपल्या व्याख्यानातून संस्थेच्या प्रगतीचा गुणगौरव केला. यावेळी सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्ताने शिवाजी महाविद्यालयाच्या कार्याचा इतिहास असलेल्या किसान वार्षिक अंकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले .कार्यक्रमाच्या  प्रास्ताविकातून प्राचार्य डॉ. विनायकराव जाधव यांनी महाविद्यालयाच्या शैक्षणिक ,सांस्कृतिक ,क्रीडा व सामाजिक कार्यातील योगदानाचा आढावा घेतला .अध्यक्षीय समारोप प्रसंगी प्रा .विजयकुमार पाटील म्हणाले आमची पन्नास वर्षे ही वरचेवर प्रगतीची आहेत. आमच्या पूर्ण संस्थेतून अठरा हजार पेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेऊन बाहेर पडतात. ज्या उद्देशाने हे रोपटं लावलं त्याच उद्देशाने आम्ही वटवृक्षात रुपांतर करण्याचा प्रयत्न करत आहोत असेही ते म्हणाले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. चंद्रशेखर मलकमपटे व प्रा.पावडे एस.एस.यांनी तर आभार प्रा .डॉ .सुरेश शिंदे यांनी मांनले. कार्यक्रमाला   परिसरातील शिक्षणप्रेमी ,सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते ,महाविद्यालयातील कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.