पत्रकारांना मोफत हेल्मेट वाटप व दहा लाख रुपयांचा विमा वाटप

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई शाखा अहमदपूर जिल्हा लातूरच्या वतीने  पत्रकारांना मोफत हेल्मेट वाटप व दहा लाख रुपयांचा विमा वाटप



अहमदपूर - महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई शाखा अहमदपूर जिल्हा लातूर यांच्या वतीने आज दिनांक 22 फेब्रुवारी रोजी पत्रकारांना मोफत हेल्मेट वाटप व दहा लाख रुपयांचा विमा वाटप कार्यक्रम पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या अध्यक्षते खाली होत आहे. यावेळी प्रमुख अतिथी अहमदपूर मतदार संघाचे आमदार बाबासाहेब पाटील,अहमदपूरच्या नगराध्यक्ष अश्विनीताई कासनाळे, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉक्टर अश्विनी शेलार, माजी सभापती भारत चामे,उपसभापती बालाजी गुट्टे, बीडचे जिल्हाध्यक्ष वैभव स्वामी, लातूरचे प्रभारी प्रमोद मोकाशे,कार्यक्रमाचे संयोजक अहमदपूर पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष प्राध्यापक विश्वंभर स्वामी, तालुका संघटक गजानन भुसारे, सचिव शिवाजी पाटील आदींची प्रमुख उपस्थिती आहे.