कै.रूक्मिणबाई सार्वजनिक वाचजनालय होनीहिप्परगा येथे कुशुमाग्रज यांची जयंती साजरी
कै.रूक्मिणबाई सार्वजनिक वाचजनालय होनीहिप्परगा येथे कुशुमाग्रज यांची जयंती साजरी


उदगीर(प्रतिनिधी)- कै.रूक्मिमबाई सार्वजनिक वाचनालय,होनीहिप्परगा येथे बि.वा.शिरवाडकर ऊर्फ कुशुमाग्रज यांच्या जयंती महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावचे सरपंच लक्ष्मण वसराम जाधव व प्रमुख वक्ते मिरजकर दिपक पुंडलीकराव हे लाभले, बि.वा. शिरवाडकर उर्फ कुशुमाग्रज यांची जंयती मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीस बि.वा.शिरवाडकर यांच्या प्रतिमेस ग्रंथालयाचे अध्यक्ष सौ.शांता उदगीरकर यांनी घातले व प्रमुख पाहुणे व अध्यक्षांचे शाल,श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात तृप्ती गायकवाड, शुभम सुरेश गायकवाड, विश्‍वरत्न गायतुलवाड, आकाश गायकवाड, सैलानी महेताब मिर्झा, सपना सोमवंशी यांनी वि.वा. शिरवाडकर ऊर्फ कुशुमाग्रज यांच्या जिवणावर उत्तम शैलीत भाषणे केली. त्याचंया या भाषण कौशल्याना प्रोत्साहन म्हणून ग्रंथालयामार्फत बक्षीस मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. या कार्यक्रमात मिरजकर दिलीप यांनी उत्तम मार्गदर्शन केेल व ग्रंथालयाचे सचिव माधव गायकवाड यांनी बि.वा. शिरवाडकर ऊर्फ कुशुमाग्रज यांचे काव्यातून व नाटक, कादंबर्‍यातून उल्लेखनीय असे सामाजीक वर्णन, स्वातंत्र्य लढ्यात सहभाग अस्पृश्यता निर्मूलन यावर प्रकाश टाकून मराठी भाषा गौरव दिनाचे महत्व पटवून सांगितले. या कार्यक्रमास सरपंच लक्ष्मण जाधव, मिरजकर, शेषेराव गायकवाड,बुराव गायकवाड, तातेराव गायकवाड, गोरोबा गायकावड, अशोक हैबतपूरकर, मरिबा गायकवाड, बजरंग गायकवाड, सिकंदर मिर्झा, सचिन उदगीर, किशन गायकवाड, विश्‍वास गायकावड व शाळेतील सर्व विद्यार्थी उपस्थित होते. अध्यक्षस्थानी अध्यक्षीय समारोपाचे बाषण केल्यानंतर ग्रंथालयाचे ग्रंथपाल सचिन उदगीरकर यांनी सर्व मान्यवरांचे व उपस्थितांचे आभार मानले आणि या कार्यक्रमाचे शेषेराव गायकवाड यांनी आभार व्यक्त केले.