गट विकास अधिकारी अंकुश चव्हाण साहेब यांनी सायकल खरेदी करून प्रदूषण मुक्तीसाठी आपले पाऊल उचलले.
काल पाच वाजता साहेबांचा फोन आला होळसंबरे सर तुमचा एक पात्री प्रयोग पाहून सायकल खरेदी करतोय. गिअरची सायकल घेऊ की बिगर गिअरची सायकल घेऊ असा प्रश्न विचारला. यावर आमची बरीच चर्चा झाली. मी आधुनिक टेक्नॉलॉजीनियुक्त गिअरची सायकल घेण्याचा सल्ला दिला. एक दिलदार मनाचा, कलेचा चाहता, कर्तव्यदक्ष अधिकारी किती महान आहे याची प्रचिती आम्हाला त्यांच्या संपर्कात असल्यामुळे वारंवार येत आहे हे मला सांगावेसे वाटते . या अगोदर माझा सायकल वरील पथनाट्यरुपी एकपात्री प्रयोग पाहून त्यांनी मला 2000 रुपये बक्षीस दिले व सर्वांना सायकल वापरण्याचे आव्हान केले होते पण आज स्वतः सायकल खरेदी करून वापरायला सुरुवात केली हे खूपच अभिमानास्पद व समाजाला प्रेरणादायी आहे. हे माझ्यासाठी खूपच महत्त्वाचे आहे कारण याचे श्रेय त्यांनी मला दिले आहे.
त्यांच्या कार्याला मानाचा मुजरा ... .!