शास्त्री शाळेत स्वातंत्र्यवीर सावरकर पुण्यतिथी साजरी.









शास्त्री शाळेत स्वातंत्र्यवीर सावरकर पुण्यतिथी साजरी.


उदगीर:येथील लाल बहादूर शास्त्री प्राथमिक विद्यालयात स्वातंत्र्यवीर सावरकर यांची पुण्यतिथी साजरी करण्यात   आली.कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून मुख्याध्यापक श्री देविदास राठोड तर प्रमुख पाहुणे म्हणून विभाग प्रमुख श्री अंकुश मिरगुडे, प्रमुख वक्ते म्हणून श्री मुरलीधर गवळी उपस्थित होते.

   मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते सावरकरांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. इयत्ता चौथीतील विद्यार्थिनी कु.श्रिया गुरुदत्त महामुनी व कु.समृद्धी महेश मुसळे यांनी स्वतंत्रतेचे स्तोत्र गाईले.३ री,४ थी विभागातून एकुण४० विद्यार्थ्यांनी भाषणे केली.

    प्रमुख वक्ते श्री मुरलीधर गवळी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी माहिती विद्यार्थ्यांना सांगितली.त्यांच्या जीवनातील अनेक प्रसंग अतिशय रंजक पध्दतीने सांगून एक तास विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले. अध्यक्षीय समारोपपर भाषणात सर्व विद्यार्थ्यांनी सावरकरांविषयीची माहिती लिहून आणण्यास सांगितले.

    कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री रमेश सातपुते यांनी केले. स्वागत व परिचय श्रीमती निता वट्टमवार, सुत्रसंचलन सौ भाग्यश्री स्वामी तर आभार सौ श्रीदेवी कबाडे यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता सामुहिक पसायदानाने झाली. कार्यक्रमाच्या यशश्वितेसाठी सर्व शिक्षकांनी सहकार्य केले.