बोरगाव बु येथे शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी.
बोरगाव( बु ) लातूर जिल्ह्याची श्रीलंका समजल्या जाणार्या बोरगाव बु या गावात दरवर्षी प्रमाणे याही वर्षी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती बोरगाव बु ता उदगीरच्या वतीने सकाळी 10:00 वाजता श्रीरंग माकणे( पोलिस पाटील)यांच्या हस्ते प्रतिमेचे पुजन व ध्वजारोहन करण्यात आले.श्री एकनाथ गोजेगावे (सरपंच) याच्या हस्ते शिवाजी हमाराज याच्या पुतळ्याचे पुजन करण्यात आले.व दुपारी 12:00वाजता गावातील मुख्य रस्त्यावरून मोटार सायकल रॅली काढण्यात आली.दिनाक 17 फेब्रुवारी यादिवसी संध्याकाळी शिवव्याख्याते ब्रम्हानंद महाराज हंगरगेकर कर्नाटक यानी संत साहित्य व शिवचरित्रातील प्रेरणा या विषयावर मार्गदर्शन केले. जयंती गावातील सर्व जातीधर्माचे लोक एकत्र येऊन साजरी केले याप्रसंगी नवनिर्वाचित कृषी मंडळ अधिकारी श्री दिलीप जाधव याचा जयंती निमित्ताने सत्कार करण्यात आला व गावातील तरूणानी शिवजयतीच्या निमित्ताने प्रेरणा घ्यावी व चागवले विद्यार्थीी घडावे असे सागण्यात आले. सायकाळी 4:00 शिवाजी महाराज तैल चिताची मिरवणूक काढण्यात आली.टामुक्ती अध्यक्ष नागोराव पाटील माजी उपसरपंच पंढरी लोणे,माजी सैनिक गणेश गोजेगावे, राम जाधव, मारोती बोरगावकर ब्ळीराम बिरादार ( ग्रा प सदस्य ) शिवाजी गोजेगावे इत्यादी उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सार्वजनिक जयंतीचे अध्यक्ष रणजित गोजेगावे,सुनिल बिरादार ,बाळू इंगळवाड,अक्षय जाधव,मंगेश जाधव राहुल गोजेगावे,विजयकूमार गोजेगावे,श्रिनिवास पा टील,संतोष मालू,संतोष गोजेगावे,अकबर शेख,राहुल बिरादार,मारोती झिपरे, यानी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.व गावातील ग्रामस्थ व शिवप्रेमी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
Attachments area