त्या' पहाटेच्या शपथेवर फडणवीस दादांना म्हणाले, तुम्हीही बोलू नका, मीही बोलत नाही

त्या' पहाटेच्या शपथेवर फडणवीस दादांना म्हणाले, तुम्हीही बोलू नका, मीही बोलत नाही





मुंबई : मुंबईतील आझाद मैदानात सुरु असलेल्या आंदोलनाचा मुद्दा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज विधानसभेत मांडला. याबाबत चंद्रकांत पाटील म्हणाले, "मराठा समाजाचे लोक आंदोलनाला बसले आहेत. त्यांच्या प्रश्नातून काही मार्ग निघत नाही. काही मुलांची सेवा सामावून घ्यावी अशी मागणी आहे. अजित पवार ऑन द स्पॉट निर्णय घेतात. जसा त्यांनी रात्री निर्णय घेतला आणि सकाळी शपथविधी झाला,’


अजित पवारांनी मराठा आंदोलक तरुणांबाबत असाच ऑन द स्पॉट निर्णय निर्णय घ्यावा असं चंद्रकांत पाटलांना सूचवायचं होतं. त्यासाठी त्यांनी अजित पवारांनी फडणवीसांसोबत घेतलेल्या शपथेचा दाखला दिला. यावर "दोन-तीन दिवसात मराठा आंदोलकांबाबत बैठक घेऊन निर्णय घेऊ. त्यात काही वेगळे मुद्दे असल्याच बोलताना अजित पवारांनी सांगितले.


त्यानंतर अजित पवारांनी चंद्रकांतदादांनी दिलेल्या शपथेच्या दाखल्यावर भाष्य केलं. "चंद्रकांतदादा तुम्ही म्हणाला रात्री निर्णय घेतला आणि सकाळी शपथ.. असं म्हणत असतानाच देवेंद्र फडणवीसांनी मध्येच हस्तक्षेप केला. देवेंद्र फडणवीस लगेच बोलले की तुम्ही (अजित पवार) त्यांच्याकडे लक्ष देऊ नका, तुम्ही बोलू नका, मीही बोलत नाही. मग अजित पवार म्हणाले ते (फडणवीस) बोलले म्हणून मी बोलत नाही.