देवणी वार्ता

अबब ! सातबारा तब्बल तीनशे रुपयाला !!


 गावपुरते तलाठी सज्जे नावालाच 


---------------------------------


 सर्वच तलाठी सज्जे देवणी शहरात शेतकऱ्यांची हेळसांड महसूल विभागाचे दुर्लक्ष


----------------------------------


देवणी : शेतकरीच आजच्या प्रत्येक शासनाचा कणाच बनला आहे सरकार कोणत्याही राजकीय पक्षाचे येवो शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्याकडे प्राधान्याने लक्ष दिले जात असून  विविध शासकीय योजना त्यांच्यापर्यंत कश्या पोहचविल्या जातील याकडे जातीने लक्ष दिले जात असताना मात्र  देवणी तहसिल कार्यालय मात्र अपवाद आहे शेतकरी व प्रशासनात दुवा म्हणून काम करणारे गाव कामगार तलाठी यांनी तालुक्यतील गावा गावात असलेले तलाठी सज्जाचे सर्वच कार्यालय देवणी शहरात थाटले असल्याने शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात हेळसांड होत आहे काम सोडून देवणीला येणे एसटी चे प्रवास भाडे व त्याचा वयक्तिक थोडाफार खर्च  पहिला असता एक सातबारा शेतकरी यांना तब्बल तीनशे रुपयेला मिळत आहे  त्यामुळे प्रत्येक गावच्या नावावर असलेली सज्जे त्याच ठिकाणी कार्यान्वित करण्यात यावी शेतकरी यांची हेळसांड थांबवावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे


सविस्तर माहिती अशी की  त्यांच्या नावातच गाव कामगर तलाठी असे आहे त्यांना त्यांना ठरून दिलेल्या सज्जावर उपस्थित राहून काम करणे बंधनकारक आहे तसे होताना दिसून येत नाही नावात गाव कामगार तलाठी कार्यालय मात्र शहरात असे कसे शक्य आहे या तलाठ्यावर नियंत्रण ठेवणारे महसूल प्रशासन  देवणी तहसिल कार्यालयात अस्तित्वात आहे किंवा नाही प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहेत देवणी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या अनेक समस्या वाढल्या आहेत विविध प्रकारच्या शासन योजना साठी लागणारे ,सातबारा ,फेरफार, वारसाच्या नावातील दुरुस्ती,  शेतकऱयांच्या वादविवादातील अनेक आरोआरची अनेक प्रश्न प्रशासनाकडून शेतकरी यांची दिशाभूल व आर्थिक लूट 


मयत वारसांच्या सातबारा दुरुस्ती बाबत महसूल कायद्यात दुरुस्ती तरतूद असताना  महाराष्ट्र शासनाच्या राजपत्र च्या  नावाखाली मायताच्या वारसांची अवहेलना शासकीय कामासाठी लागणारे सातबारा साठी ठरून दिलेल्या रकमेपेक्षा आगाऊ रक्कम वसूल करणे फेरफार  उत्पन्न  विध्यार्थ्यांना लागणाऱ्या कागदावर साह्य शिक्के करण्यासाठी आर्थिक लूट करणे प्रधान मंत्री सन्मान निधी ,व नुकसानभरपाई संदर्भात निधी तहसिल कार्यालया मार्फत बँकेला पाठविण्यासाठी पैशाची मागणी करणे त्यांची आर्थिक लूट करणे असे सर्रास प्रकार  देवणी तालुक्यातील महसूल विभागांतर्गत चालू आहेत हा सर्व प्रकार तहसीलदार यांना माहिती आहे परंतु याकडे अक्षम्य दुर्लक्ष केले जात आहे हे सर्व प्रकार टाळण्यासाठी प्रत्येक सज्जावर त्यांची कार्यालय चालू झाली पाहिजे तरच शेतकरी यांची हेळसांड होणार नाही विविध प्रकारच्या कागदपत्रांसाठी हेळसांड होणार नाही देवणी शहरातील तलाठ्यांनी कार्यालयाच्या माध्यमातून थाटलेली दुकानदारी बंद करून  ठरऊन दिलेल्या ठिकाणी तलाठी कार्यालय चालू करावी अशी मागणी शेतकऱ्यांतुन होत आहे