विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी स्नेहसंमेलन हे प्रभावी माध्यम* ----
आपल्या पाल्याच्या कलागुणांना वाव मिळावा याकरिता शाळेमध्ये आयोजित करण्यात येणारी स्नेहसंमेलने अतिशय उपयुक्त असतात या स्नेहसंमेलना मध्ये आपल्या पाल्यांच्या कलागुण पाहण्यासाठी व त्यांचे कौतुक करण्यासाठी माता-पालक यांची लक्षणीय उपस्थिती असते,
वार्षिक स्नेह संमेलनाच्या माध्यमातून आपापली पाल्य वेगवेगळ्या कलाविष्कार सादर करतात नृत्य, नाटिका ,डान्स , विविध वेषभुषा यांच्या माध्यमातून त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास घडत असतो आणि तो घडवण्यासाठी शिक्षक ही मार्गदर्शकाची भूमिका पार पाडतात असे मत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी व्यक्त केले.
किसान शिक्षण प्रसारक मंडळ ,उदगीर द्वारा संचलित विद्यावर्धिनी प्राथमिक विद्यालय उदगीर च्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटक म्हणून बोलत असताना जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्र हे बोलत होते.
या कार्यक्रमाला किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माननीय प्रा. विजय कुमार पाटील शिरोळकर हे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते तर प्रमुख अतिथी म्हणून शहर अध्यक्ष उदायसिंग ठाकूर,हणमंतराव हंडारगुळे, श्री ज्ञानदेव झोडगे, नामदेव चामले मामा, व्यंकटराव जाधव, संजय मामा पाटील, केंद्रप्रमुख बालाजी धमन सुरे, शिवाजी महाविद्यालय चे प्राचार्य जाधव सर , अजित पाटील तोंडचिरकर , विशाल पाटील, माध्यमिक चे मुख्याध्यापक घोडके सर ,कणसे सर, अविनाश पोशेट्टी सर आदींसह शेकडो पालक उपस्थित होते.