छ.शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी

छ.शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी



उदगीर(प्रतिनिधी) उदगीर शहरामध्ये रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची ३८९ वी जयंती मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आली. या जयंती मोहत्सवामध्ये सवर्र् विद्यालय,महाविद्यलयांनी मोठ्या उत्साहाने विविध वेशभूषेत भारतीय संस्कृतीची परंपरेचे दर्शन घडवीले. लेझीम, ढोलताशा, विविध जातीच्या वेशभूषेतील नृत्य सजरा करण्यात आले. याचसोबत शहरातील विविध सामाजिक संघटांनी या जयंतीमध्ये येणार्‍या सर्व शिवभक्तांसाठी पाणी, शरब, बिस्किट आदी वाटप केले. विशेष बाब म्हणून मुस्लीम संघटनांनी पोलिस स्टेशन, कॉर्नर चौक, चौबारा, डि.सी.सी.बँके समोर आदी ठिकाणी स्टॉल लावून पाणी पीण्याची सोय केली होती, उदगीर शहर संपूर्ण शिवजयंतीमय झाले. 
शहरात चौका-चौकामध्ये राजयकीय,सामाजिक बॅनर लावून शिवजयंतीच्या शुभेच्छा देण्यात आल्या. विविध स्टॉल लावण्यात आले. यावर लाखो रूपयांचा खर्च करण्यात आला. प्रत्येकजण भगवे किंवा पांढरेशुभ्र कपडे घालून डोक्यावर भगवे फेटे, मोटारसायकला मोठ मोठे झंडे, दुचाकींना झेंड्याने समोरून झाकलेले दुचाकी स्वार शहरामधून गेल्या तीन दिवसापासून फिरत होते. यामध्ये कांही दुचाकीवाल्यांनी सायरनचा कर्कश व जोराचा आवाज करत शहरामधून धावत होते यामुळे सर्वसामान्य जनतेला त्रास होत होता. 
उदगीर येथील सार्वजनिक जयंती महोत्सवाच्या वतीने दि.१८ फेब्रुवारी रोजी मोटार सायकल रॅली काढण्यात आली. नगर परिदेवर सायंकाळी उदगीर तालुक्यातील विविध शाळेच्या वतीने सामूहिक नृत्य सादर करण्यात आले. तीन दिवसापासून विविध व्याख्यातांचे व्याख्याने सादर करण्यात आले. तीन ते चार दिवसात विविध कार्यक्रमावर विविध संघटनांकडून राजकीय,समाजिक कार्यकर्ते,नेत्यांंकडून लाखो रूपय खर्च करण्यात आले. यामध्ये नगर परिषदेने आपला मोलाचा सहभाग नोंदवला. पण ज्यांची जयंती आहे त्यांच्याच चौकातील पुतळ्याची दुरावस्था पाहिल्यास लाज वाटावी अशी अवस्था झाली आहे. शिवजयंती निमित्त शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास सजवून रात्रीच्यावेळी लायटिंग, कारंज्या, विविध फुलांनी व माळांनी चौकाशी सुशोभीकरण करणे गरजेचे होते पण नगर परिषदेने याकडे अक्षम्य दुर्लक्ष करून फक्त साफसफाईन करण्यात आली व छोटासा हार घालून जंयती साजरी करण्यात आली. याकडे कोणाचेही लक्ष गेले नाही. सार्वजनिक जयंती महोत्सव समितीनेही याकडे लक्ष दिले नाही.  दि.१५ फेब्रुवारी रोजी छावा संघटनेच्या वतीने नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण व दुरुस्ती करून घेण्याचे (पान ३ वर)  कळवीले होते.
 यामुळे उदगीर येथील छावा संघटनेच्या वतीने शिवाजी चौक येथे नगर परिषदेच्या विरोधात नाराजी व्यक्त करत निषेध करण्यात आला. यावेळी छायावाचे दत्ता पाटील शेल्हाळकर, जिजामाता संघटनेच्या महिला, अशोक बिरादार,कवी, लेखक विजय चिखले शेल्हाळकर व शेकडोच्या संख्येने शिवप्रेमी उपस्थित होते. 


शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण न कल्यामुळे शिवप्रेमीच्या वतीने नगर पालिकेचा जाहिर निषेध



सार्वजनिक शिवजयंती महोत्सव अध्यक्ष व नगर पालिका प्रशासन व नगराध्यक्ष यांचा  शिवाजी महाराजांना जयंती महोत्सवानिमित्त सुशोभि करण सजावट न करता साधा फुलाचा हार घालून सार्वजनिक शिवजयंती साजरी केली  माझ्यासारख्या असंख्य मावळ्याचे मन दुखावल्यामुळे छत्रपती शिवाजी राजे नसते तर ....आपले अस्तित्वातच राहिलें नसतो . ना महाराष्ट्र घडला असता ना भारत दिसला असता ना हिंदुस्तान .. विश्वाच्या नकाशावर राहिला नसता म्हणून जाहीर निषेध... निषेध.. निषेध