चोर सोडून सन्यासाला फाशी? उदगीर पोलिसांकडून चौकशी न करता पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल
चोर सोडून सन्यासाला फाशी?
उदगीर पोलिसांकडून चौकशी न करता पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल

राष्ट्रवादीच्या शहराध्यक्ष समीर शेखाला चडला सत्तेची नशा


उदगीर(प्रतिनिधी)- उदगीर शहरामध्ये वाढत चालेले अवैध धंदे व त्यांना राजकीय व पोलिस प्रशासनाचे असलेले आश्रय यामुळे अवैध धंदे करणार्‍यांना कोणाची भीती राहिलेली नाही यामुळे ते सर्रासपणे मटका, गुटका, लॉटरी असे विविध धंदे जोरात चालू आहेत. यांना सर्वात मोठे अभय म्हणेज पोलिस खात्याचे आहे की काय? असा प्रश्‍न आता निर्माण होत आहे तर उदगीरचे पत्रकार म्हणजे पोलिस खात्याचे दुश्मन असल्यासारखी वागणूक दिली जात आहे. इतर प्रकरणामध्ये उदगीरचे पोलिस खाते शहानिशा करून त्यावर कार्यवाही केली जाते पण पत्रकार विरोधात तक्रार किंवा बातमी दिली असता त्यावर विचार न करता किंवा शहानिशा न करता थेट तक्रारदाराकडून तक्रार मिळताच एफआयआर फाडण्यात येते. याच बरोबर सत्ता बदलली की गुन्हेगारी वृत्तीतील लोकांना अभय मिळते की काय? असे दिसते कारण त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा खरा आरोप केला कि ते थेट धमकी देतात किंवा पोलिसांना हाताशी धरून सत्तेचा गैरवापर करत खोटे गुन्हे दाखल करण्यास तयार असतात. सध्या उदगीर मध्ये सर्रासपणे मटका चालू असून याच्या विरोधात पत्रकारांनी बातम्या किंवा सोशल मिडियाच्यावर आवाज उठवल्यास पत्रकारांना टारगेट केले जाते. याच सोबत जमीनीवर कबजे करून खोटी कागदपत्रे तयार करून आपल्या नावावर करून घेतले जाते.
दि.१० फेब्रुवारी २०२० रोजी स्टार दर्पण न्यूज व सा.बसव रत्नचे संपादक सुनिल हावा यांच्यावर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष व माजी नगर सेवक शेख समीर यांनी फेसबूकवर त्यांच्या व राष्ट्रवादी पक्षाविरोधात पोस्ट टाकली म्हणून विचारपूस न करता थेट शहर पोलिस स्टेशन येथे तक्रार दिली. एफआयआर मध्ये मजकूर असा आहे की, माझी व माझ्या पक्षाची बदनामी केली म्हणून तक्रारी अर्ज दिला व त्यास दुजोरा देत पोलिसांनी विनाचौकशी एन.सी.नं.५८/२०२० कलम ५००,५०१ भादवी प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे. या सोशल मिडियाच्या पोस्टमध्ये राष्ट्रवादीच्या (पान ३ वर) कोणत्याही नेत्याचा व कार्यकर्त्याचा नामोल्लेख नाही.तसेच पक्षाची बदनामी होईल असा कोणताही उल्लेख नाही. परंतु वैयक्तीक आकसापोटी समीरोद्दीन शेख यांनी काळे धंदेवाल्यांना पाठीशी घालण्यासाठी सत्तेचा, पदाचा गैर वापर करत व पोलीसांवर दबाव आनत पत्रकार सुनिल हवा यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यास लावले आहे. याचसोबत पोलिस खात्यामध्ये पत्रकारांविषयी ऍलर्जी झाली की काय? असे दिसत आहे कारण मागील महिन्यात जुने रेस्ट हाऊस येथे नगर सेवक साबेर पटेल यांच्याकडून पत्रकार शेख अजरोद्दीन यांना मारहाण केल्याची तक्रार देऊन ही शहर पोलिस ठाण्यातर्फे कुठल्याही प्रकारची कार्यवाही न करता हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला व तक्रारदारांने दुसर्‍या पुढे करून पत्रकार शेख अजरोद्दीन यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला. यामुळे काल दि.१३ फेब्रुवारी २०२० रोजी उदगीरचे सर्व पत्रकारांनी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन सुनिल हावा यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या खोट्या गुन्ह्याची चौकशी करून पोलिसांना निलंबीत करावे व शेख समीर यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केल्या प्रकरणी योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी मुख्यमंत्री,उप मुख्यमंत्री,गृहमंत्री,पुलिस महा संचालक,विशेष पुलिस महानिरीक्षक,पुलिस अधिक्षक याना निवेदन देऊन मागणी केली आहे,
या निवेदनावर राम मोतीपवळे, रोषण मुल्ला,सचिन शिवशेट्टे,संगम पटवारी,बिबिशन मद्देवाड,महादेव घोणे, सिध्दाथर्र् सुर्यवंशी, इरफ़ाण शेख,युवराज धोत्रे,सुनिल सुतार,  बश्वेश्वर डावळे,अंबादास अल्लमखाने,रामबिलास नावंदर, निवत्ती जवळे, अँड.श्रावन माने, विश्‍वनाथ गायकवाड,श्रीनिवास सोनी, बस्वराज रोडगे, अनिल जाधव आदींच्या सह्या आहेत.