विद्यावर्धिनी पालक मेळावा संपन्न उदगीर/प्रतिनिधी येथील किसान शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचलित विद्यावर्धिनी हायस्कूलमध्ये शैक्षणिक वर्ष 2019- 20 मधून नववी उत्तीर्ण होऊन 2020 2021 दहावी नूतन येणाऱ्या विद्यार्थ्यां च्या पालकांचा पालक मेळावा मुख्याध्यापक एस.एन घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.या पालक मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजयकुमार पाटील शिरोळकर,वक्ते व प्रमुख पाहुणे म्हणून ह.भ.प विद्यावर्धिनीशाळेचे माजी मुख्याध्यापक डी.एस बन गुरुजी, अजित पाटील तोडचीरकर, मुख्याध्यापक ए.पी पोशेट्टी,पर्यवेक्षक व्ही.एम बांगे,एस.पी धुमाळे, विद्यावर्धिनी इंग्लिश स्कूलचे प्राचार्य व्ही.एस कणसे,पालक प्रतिनिधी म्हणून होळीगिरसर यांची यावेळी व्यासपीठावर उपस्थिती होती.या कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेच्या पूजनाने पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. उपस्थित सर्व मान्यवरांचे शब्द सुमनाने स्वागत संगीत शिक्षक एन.आर जवळे व वैशाली सावरे यांनी केले.यानंतर ह-भ-प बन गुरुजी यांनी पालकांना बोलताना म्हणाले की,विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा सर्वांगीण आढावा घेण्याकरिता शाळेने पालक मेळावा आयोजित केला आहे.शाळेतर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध सराव परीक्षा,उन्हाळी जादा ताशिका,रात्रीचे चे वर्ग या सर्व पूर्वनियोजित नियोजनामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्याकरिता शाळा ही कटिबद्ध असते.यामुळे विद्यार्थ्यांचा गुणवत्ता वाढते व विकास होण्यास काहीही अडचणी येत नाही त. असे मत बन गुरुजी व्यक्त केले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एम.एस जाधव,गजानन पाटील,राजेंद्र वल्ला कट्टे,अनिता पाटील यांच्यासह नववीच्या सर्व शिक्षक,शिक्षिका यांनी परिश्रम घेतले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी.व्ही बिरादर यांनी केले,तर आभार आर.व्ही ढगे यांनी मानले. या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.
विद्यावर्धिनी पालक मेळावा संपन्न