विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील २ दिवसीय कार्यशाळेत गुंतागुतीच्या १० शस्त्रक्रिया यशस्वी पार पडल्या
लातुर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र विभागा मार्फत (IAGE) इगल प्रोजेक्ट अंतर्गत 10 महिलांवर गुंतागुंतीच्या अत्याधुनिक पध्दतीच्या बिनटाक्याच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्याद्वारे थेट प्रक्षेपण करुन नवीन स्त्रीरोग तज्ञांना व विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले.
दोन दिवसीय कार्यशाळेमध्ये दिनांक 22 व 23 फेब्रुवारी रोजी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्था, लातुर व Indian Association of Gynaecological Endoscopists (IAGE) या देशपातळीवरील दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करणारी स्त्री रोग तज्ञांची संघटना, लातुर स्त्रीरोग तज्ञ संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यशाळेचे उदघाटन डॉ. गिरीष ठाकुर मा. अधिष्ठाता, यांच्या हस्ते झाले. यावेळी डॉ. मंगला शिंदे प्राध्यापक व विभागप्रमुख स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र विभाग, डॉ. कल्याण बरमदे (अध्यक्ष, स्त्रीरोग राज्य संघटना), डॉ. राजेश दरडे, (निबंधक सी. पी. एस. मुंबई) डॉ. अजय पुनपाळे, (महारष्ट्र वैद्यकीय परीषदेचे निरीक्षक) डॉ. निलिमा देशपांडे विभागप्रमुख औषधवैद्यकशास्त्र, डॉ उमेश लाड उप अधिष्ठाता, डॉ. संतोषकुमार डोपे वैद्यकीय अधिक्षक, डॉ. भाऊराव यादव संयोजक, हे उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमासाठी राज्यभरातुन 240 स्त्रीरोग तज्ञ व ३० पदव्युत्तर विद्यार्थी उपस्थित होते.
या कार्यशाळेत स्त्रीरोग तज्ञ डॉ. अनुज कुलकर्णी, डॉ. राजेश दरडे, डॉ. कल्याण बरमदे, डॉ. भाऊराव यादव, डॉ. आण्णासाहेब बिराजदार, डॉ. गणेश बंदखडके, डॉ. कृष्णा मंदाडे, डॉ. मनोज परबत, डॉ. रविंद्र सुरवसे, यांनी पिशवीला असणा़-या मोठया गाठी काढण्याच्या शस्त्रक्रिया, गर्भपिशवी काढणे, वंधत्व निवारणासाठी असणा-या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया ज्या शस्त्रक्रिया इतर ठिकाणी झालेल्या नाहीत अशा शस्त्रक्रियांसाठी मुंबईहुन अत्याधुनिक मशिनरी कार्यशाळेत मोफत उपलब्ध करुन देण्यात आल्या होत्या. अशा जटील शस्त्रक्रिया करण्यात आल्या व त्याचे थेट प्रक्षेपण कार्यशाळेत करण्यात आले होते. या कार्यशाळेसाठी महाराष्ट्र वैद्यकीय परीषदेने ४ गुण दिले आहे.
या कार्यशाळेच्या यशस्वितेसाठी डॉ अनिता पवार, डॉ. निहारीका नागरगोजे, डॉ. शितल लाड, डॉ. विष्णु तरसे, डॉ. नितीन मदने, डॉ. सुजाता सावंत, डॉ. जॉयती पांजा, डॉ. मयुरी हंजे, डॉ. प्रांजली सुर्यवंशी व इतर पदव्युत्तर विद्यार्थ्यांनी परीश्रम घेतले.