आप नगरसेवकाच्या घरावर पेट्रोल बॉम्ब आणि दगडांचा खच

आप नगरसेवकाच्या घरावर पेट्रोल बॉम्ब आणि दगडांचा खच




नवी दिल्ली, 27 फेब्रुवारी : उत्तर-पूर्व दिल्लीतील खजूरी येथे हिंसाचार भडवण्यासाठी आम आदमी पक्षाचे नगरसेवक ताहिर हुसैन यांचा हात होता? त्यांच्या घरातील काही छायाचित्रामुळे ते संशयाच्या घेऱ्यात आले आहेत. ताहिर हुसैन यांच्या घरातून पेट्रोल बॉम्ब, बंदुका, मोठ मोठे दगड, बॅचकी जप्त करण्यात आले आहेत. त्यांच्या घराचा एक व्हिडिओ समोर आला होता. ज्यामध्ये घरातून सतत दगडफेक व पेट्रोल बॉम्ब येत होते. गुप्तचर विभागाचे सहकारी अंकित शर्मा यांच्या हत्येसाठी त्यांचे कुटुंबीय या घराच्या छतावर असलेल्या लोकांना जबाबदार ठरवित आहेत. आम आदमी पार्टीचे नगरसेवक ताहिर यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत. यासाठी पार्टीदेखील ताहिर हुसैन यांच्या बचावासाठी समोर आली आहे. या प्रकरणात निष्पक्ष तपासाची मागणी करीत आहे.