*उदयगिरी अॅकॅडमीची शैक्षणिक सहल उत्साहपुर्ण वातावरणात संपन्न.*
उदगीर,
अभ्यासातील ताण तणावातून विद्यार्थ्यांना विरंगुळा मिळावा व ते नव्या जोमाने पुन्हा अभ्यासाला लागावेत या उद्देशाने आयोजित केलेल्या शैक्षणिक सहलीचा विद्यार्थ्यांनी मनसोक्त आनंद लुटला.
या एकदिवसीय सहलीचे आयोजन दि.23/02/2020 रोजी चाकूर येथील "साईनंदनवन - वृंदावन गार्डन व वाॅटर पार्क " येथे करण्यात आले होते. या ठिकाणी विद्यार्थ्यांनी मिनी रेल्वे, डॅशिंग कार, बोटिंग, विविध प्रकारचे झोके, रोप वे, वाॅटरपार्क इत्यादींचा मनमुराद आनंद लुटला. या सहलीच्या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये स्नेह व संघभावना वाढीस लागली. सहलीचा हा एक दिवस नक्कीच विद्यार्थ्यांच्या दीर्घकाळ स्मरणात राहील.
या सहलीचे संपूर्ण नियोजन व व्यवस्थापन उदयगिरी अॅकॅडमीचे संचालक प्रा.गोपाळकृष्ण घोडके सर यांनी केले तर ही सहल यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्रा.संतोष पाटील, प्रा.सौ.ज्योती खिंडे, प्रा.सौ मीना हुरदळे, प्रा. सौ.प्रेरणा गवळी, प्रा.श्रीगण रेड्डी, श्री.सतीश माने, श्री.इरशाद हडोळतीकर या सर्वांनी परीश्रम घेतले. या प्रसंगी, या सहलीस श्री.सतीश पाटील( मानकीकर ) यांचेही सहकार्य लाभले.