जिव्हाळा द्वारा राष्ट्रीय विज्ञान दिन व वाढदिवस.
_____________________
28 फेब्रुवारी"राष्ट्रीय विज्ञान दिवस"यांचे औचित्य साधून जिव्हाळा सदस्य श्री रमेश खंडोमलके यांचा पन्नासावा वाढदिवसही साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.विजय पाटील सभापती पंचायत समिती उदगीर, तर प्रमुख उपस्थितीत नप मुख्याधिकारी राठोड साहेब,श्रीकांत पाटील , देविदास नादर्गे, मरलापल्ले,अरुणाताई भिकाणे उपस्थित होते.
तर मार्गदर्शक म्हणून डॉ.राहुल आल्लापुरे,
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर अनिल भिकाणे. करताना म्हणाले की ,जिव्हाळा ग्रुप सातत्याने अनेक सामाजिक ,शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करतो. त्याचाच एक भाग म्हणून राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून जिव्हाळा सदस्य श्री रमेश खंडोमलके व सौ. अलोलिका खंडोमलके यांचा सपत्नीक सत्काराचे आयोजन करण्यात होते .अध्यक्षा करवी शाल श्रीफळ सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
प्रा.डाॅ. राहुल अल्लापुरे यांनी विज्ञान नवी दिशा आणि त्यात स्त्रियांचे महत्त्वपूर्ण योगदान. यावर प्रकाश टाकताना राष्ट्र जडनघडणीत विज्ञान कसे सहाय्यभूत ठरते यांचे अनेक उदाहरणे देऊन पटवून सांगितले. महिला संशोधन केंद्राची नितांतआवश्यकता आहे. याचाआपण सर्वांनी मिळून पाठपुरावा करावा. तरच अनेक वैज्ञानिक आपल्या देशाला लाभतील आणि पर्यायाने राष्ट्राची उन्नती होईल. असा विश्वास व्यक्त केला.
एका बाल वैज्ञानिक ज्ञानेश्वर मंदाडे व त्यांच्या मार्गदर्शिका सौ. चौधरी यांचाही प्रसंगी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सुभाष तगाळे त्यांनी केले तर आभार देविदास नादर्गे यांनी मानले.
प्रसंगी जिव्हाळ्याचे चंद्रकांत रोडगे, अमृतराव देशपांडे, रमाकांत बनशेळकीकर, विश्वनाथ मुडपे, चंद्रकांत भद्रे प्रभाकर कुलकर्णी, दयानंद शिवशेट्टे सिंदबंदगीकर,पंचगल्ले अन्ना, विवेक होळसंबरे,लक्ष्मीकांत बिडवई ,सोपानराव माने, साबणे ,बोडके सर, शिंदे सर, उपरबावडे, विश्वनाथ माळेवाडीकर यांनी परिश्रम घेतले