खोट्या केसेस करू नका ; गावातील प्रकरणे गावातच मिटवा  न्या. पी.डी. सुभेदार 





खोट्या केसेस करू नका ; गावातील प्रकरणे गावातच मिटवा  न्या. पी.डी. सुभेदार 


 

अतनूर / प्रतिनिधी -वाद खरोखरच गावात मिटत नसतील तरच पहिली वर्दी म्हणजेच एफआयआर किवा कोर्टात दाद मागा, खराच अन्याय झाला असेल तरच एफआयआर  किंवा दिवाणी न्यायालयात दाद मागत जा,  खोटे केसेस करू नका,  गावातील प्रकरणे गावातच मिटवा, न्याय तुमच्या दारी आला आहे. छोटे प्रकरणावरून वाद वाढवू नका, पती-पत्नीचे सुंदर हे नाते चांगले राहू द्या, असे प्रतिपादन तदर्थ जिल्हा न्यायाधीश वर्ग १ चे. न्यायमूर्ती पी.डी. सुभेदार यांनी केले. उदगीर तालुका विधी सेवा समिती यांच्या वतीने मोबाईल लिगल सर्विसेस कम लोक अदालत स्कीम निमित्त मौजे अतनूर ता.जळकोट येथे ( दि. 23 ) वार रविवार रोजी ' न्याय तुमच्या दारी ' या योजने अंतर्गत फिरते वाहन मोबाईल व्हॕन व्दारे विधी साक्षरता शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ. दिपाली कोकणे या होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून तदर्थ जिल्हा न्यायाधीश वर्ग १ उदगीरचे. न्या. पी.डी.सुभेदार, दिवाणी न्यायाधीश क.स्तर उदगीरचे न्या. बि.व्ही. दिवाकर, ज्येष्ठ विधी तज्ञ अँड.एस.टी. पाटील, अँड. प्रसाद लासोनकर, अँड.अजित सावंत, अँड.राहुल हैबतपुरे, अँड. पवण कोणे, अँड.राजकुमार नावंदर, पोलीस पाटील प्रकाश पाटील, लातूर जिल्हा युवक कुणबी मराठा मंडळाचे प्रदेशाध्यक्ष बी.जी.शिंदे, जिजामाता महिला मंडळाच्या सचिव शकुंतला बाबर,  जनक्रांती डोंगरी विकास बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष एस.जी.शिंदे,  वसुंधरा महिला मंडळाच्या सचिव सौ.संध्या शिंदे, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे उदगीर तालुका अध्यक्ष तथा पत्रकार बाळासाहेब शिंदे, पत्रकार किशन मुगदळे, पञकार संजय शिंदे, शिवसेनेचे जळकोट तालुका उपप्रमुख विकास सोमुसे-पाटील, उपसरपंच शहाजी पाटील, संभाजी पाटील, मुक्तेश्वर येवरे, ग्रामसेवक फिरोज शेख, साधूराम ग्रामीण विकास बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे कापडे, युवानेते दिलीप कोकणे, दिगांबर सोमुसे-पाटील, सुर्यकांत येवरे, धोंडीराम सोमुसे, गव्हाणे-पाटील, येवरे-पाटील, शिंदे-पाटील, सोमुसे-पाटील, शिंदे, कांबळे, गायकवाड, मुंजेवार, आत्तार आदिची उपस्थिती होती.

सदर कार्यक्रमाच्या वेळी प्रमुख पाहुणे न्या.बि.व्ही.दिवाकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना पोस्को कायदा, बाल लैंगिक प्रतिबंधक कायद्याची माहिती दिली. सदर कायदा अंतर्गत महिला मे.न्यायालयात अन्याया विरुद्ध कशी दाद मागू शकते व कायदा बाधित महिलांना कशा प्रकारांचे कायदा संरक्षण देतो. याबद्दल सविस्तर माहिती गावातील नागरिकांना दिली.

अध्यक्षीय भाषणात तदर्थ जिल्हा न्यायाधीश वर्ग-१ उदगीरचे न्या.पी.डी.सुभेदार मार्गदर्शन करताना म्हणाले की,गावातील वाद हे गावातच सामजस्यपणांने मिटवावेत, कायद्या बद्दलच्या माहिती घ्या, आजच्या सारखे ' न्याय तुमच्या दारी ' योजने अंतर्गत फिरते वाहन मोबाईल व्हॕन तथा विधी साक्षरता शिबीर तुमच्या गावात घेण्यासाठी तुमच्या गावातीलच विधी तज्ञ, सेवाभावी संस्था, महिला मंडळ, सामाजिक संस्था यांना भेटत जा आणि अजून अशा प्रकारचे कार्यक्रम तुमच्या गावात सतत घेत जा कायदे कळतील लोक जागृती होईल आणि गावातील वाद ही गावातील प्रतिष्ठित मिळतील.याचा सगळ्यांनी प्रयत्न करा. अगोदरच कोर्टात खूप केसेस पेंडिंग आहेत. त्यामुळे नवीन केसेस खोट्या दाखल करू नका, वादाने कोणाचा फायदा होत नाही म्हणून वाद गावातच मिटवा,  असे आवाहनही यावेळी उपस्थितांना केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत अँड. बी.एम.सासट्टे यांनी केले. तर आभार अँड.दयानंद पाटील यांनी मानले.यावेळी गावातील महिला, नागरिक, युवक-युवती, विद्यार्थी-विद्यार्थिनी, पुरुष-स्त्री, प्रतिष्ठित नागरिक, सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील पदअधिकारी, समाजसेवी , समाजसेवक व सेवाभावी संस्थेचे पदाधिकारी, महिला मंडळाच्या पदाधिकारी, सदस्य, सदस्या, आंगणवाडी कार्यकर्ती, मदतणीस, आशा वर्कर, आरोग्य सेविका मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायतचे सर्व पदअधिकारी, सदस्य, सदस्या, विधीतज्ञ, वकील, सेवाभावी संस्थेचे पदअधिकारी, समाजसेवक, सामाजिक कार्यकर्ता, कार्यकर्ती, महिला मंडळाच्या सदस्या, ग्रा.प. कर्मचारी गुंडू बोडेवार, चंदर गायकवाड, किशन बारसुळे, खंडू गायकवाड आदिनी विशेष परिक्षेम घेतले.


 

 




 

Attachments area