पाकिस्तानमध्ये नाही तर 'या' ठिकाणी होणार आशिया चषक स्पर्धा, गांगुलीने केले स्पष्ट

पाकिस्तानमध्ये नाही तर 'या' ठिकाणी होणार आशिया चषक स्पर्धा, गांगुलीने केले स्पष्ट




भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) संघात होणाऱ्या क्रिकेट सामन्याची वाट पाहत असलेल्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. यावर्षी सप्टेंबरमध्ये दुबई (Dubai) येथे होणाऱ्या आशिया चषक स्पर्धेत हे दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध भिडणार असल्याची माहिती बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुलीने (Sourav Gangu) शुक्रवारी दिली.


या संदर्भात बोलताना गांगुली म्हणाला की, आगामी आशिया चषक स्पर्धेच (Asia Cup Tournament) आयोजन दुबई येथे होणार आहे. यामध्ये भारत आणि पाकिस्तान या दोन्हीही संघांना या स्पर्धेत सहभाग घेण्याची संधी मिळेल.


आशिया चषक स्पर्धेचे आयोजन करण्याची संधी पाकिस्तान संघाला मिळाली होती. परंतु सुरक्षेच्या कारणांमुळे भारतीय संघ पाकिस्तानचा दौरा करणार नसल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले होते. त्यामुळे ही स्पर्धा दुबईमध्ये आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.


"आशिया चषक स्पर्धा दुबईमध्ये होईल आणि यामध्ये भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ सहभागी होतील," असे 3 मार्चला होणाऱ्या आशियाई क्रिकेट समितीच्या बैठकीसाठी दुबईला जाण्यापूर्वी गांगुली म्हणाला.


2012-13 दरम्यान पाकिस्तान संघ मर्यादित षटकांची मालिका खेळण्यासाठी भारतात आला होता. त्यानंतर भारत विरुद्ध पाकिस्तान संघात एकही द्विपक्षीय मालिका खेळण्यात आलेली नाही. दोन्हीही देशातील तणावामुळे भारत आणि पाकिस्तान संघ फक्त आयसीसी स्पर्धेत एकमेकांविरुद्ध खेळताना दिसतात.