वीरशैव लिंगायत वधू-वर मेळाव्याच्या स्मरणिकेचे शनिवारी प्रकाशन
लातूर ः मागील महिन्यात लिंगायत महासंघाच्यावतीने लिंगायत महासंघाचे प्रांताध्यक्ष प्रा.सुदर्शन बिरादार यांच्या नेतृत्वाखाली रघुकूल मंगल कार्यालय येथे झालेल्या वीरशैव लिंगायत वधू-वर मेळाव्याच्या स्मरणिकेचे प्रकाशन शनिवार दिनांक 29 फेब्रुवारी 2020 रोजी उदगीर येथे होणार असल्याने जिल्हा सरचिटणीस चंद्रकांत कालापाटील यांनी सांगितले.
वीरशैव लिंगायत समाजाच्या वधू-वर मेळाव्याच्या स्मरणिकेचे प्रकाशन लिंगायत महासंघाचे प्रांताध्यक्ष प्रा.सुदर्शन बिरादार यांच्याहस्ते केले जाणार असून इच्छुक वधू-वरांना व त्यांच्या पालकांना लगेचच पुस्तकाचे वाटप होणार आहे.
हा प्रकाशनचा कार्यक्रम व महिला मेळावा दुधिया हनुमान मंदिर, बसस्टँड जवळ, उदगीर येथे शनिवार दिनांक 29/02/2020 रोजी सकाळी 11.00 वाजता होणार आहे. तरी लिंगायत महासंघाच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यासह, उदगीर शहरातील महिला भगीनींनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन लिंगायत महासंघाचे जिल्हा सरचिटणीस चंद्रकांत कालापाटील यांनी केले आहे.