पोस्ते पोदार लर्न स्कूल कडून शहीद दिनकर खुशालराव शिंदे यांचा सन्मान.
कै. काशीनाथ पोस्ते बहुउद्देशीय सेवाभावी संस्थे अंर्तगत चालवण्यात येणार्या पोस्ते पोदार लर्न स्कूल कडून शहीद दिनकर खुशालराव शिंदे यांचा सन्मान..उचलला त्यांच्या मुलीचा संपूर्ण शैक्षणिक खर्च...

 

उदगीर: उदगीर येथील नामांकित पोस्ते पोदार लर्न स्कूलचे 2 रे वार्षिक स्नेहसंमेलन 23 आणि 24 फेब्रुवारी दरम्यान उदगीर येथे मोठ्या उत्साहात पार पडले. यावेळी सामाजिक भान ठेऊन व आपण समाजाचे काही देणे लागतो या भावनेने उदगीर तालुक्यातील करखेली या गावचे सुपुत्र शहीद हवालदार दिनकर खुशालराव शिंदे यांच्या कुटुंबीयाचा सन्मान शाळेकडून करण्यात आला.

यावेळी संस्थेचे सचिव श्री सूरज पोस्ते, प्राचार्य श्री सूर्यकांत चवळे, तसेच प्रमुख पाहुणे म्हणून  श्री रामदास पाटील (मुख्य कार्यकारी अधिकारी नगरपरिषद हिंगोली) श्री अरविंद कुमार सिंघ (प्राचार्य पोदार इंटरनेशनल स्कूल सातारा) व श्री भारत राठोड(मुख्य कार्यकारी अधिकारी नगरपरिषद उदगीर) यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना श्री सूरज पोस्ते यानी सैनिकांचे देशासाठी जे बलिदान केले त्याचे महत्व विषद केले. आणि शहीद दिनकर खुशाल शिंदे यांची कन्या दिशा दिनकर शिंदे हिचा दहावी पर्यन्तच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च पोस्ते पोदार लर्न स्कूल मार्फत मोफत केला जाईल अशी घोषणा केली.

या सामाजिक भानाचे व शाळेने दाखवलेल्या औदार्याचे सर्व उदगीरकरान कडून कौतुक होत आहे.