खोटी तक्रार देणाऱ्या राष्ट्रवादीचे समीरोद्यीन शेख यांच्यावर गुन्हा दाखल करा- चाकुर ता.पत्रकार संघाचे निवेदन

*खोटी तक्रार देणाऱ्या राष्ट्रवादीचे समीरोद्यीन शेख यांच्यावर गुन्हा दाखल करा- चाकुर ता.पत्रकार संघाचे निवेदन


उदगीर येथील पत्रकार तथा जिल्हा मराठी पत्रकार संघाचे जिल्हा कार्यकारणी सदस्य सुनील हावा यांच्यावर उदगीर शहर पोलिस ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष समिरोद्यीन शेख यांनी उदगीर शहर पोलिस स्टेशन  येथे दाबाव तंत्र वापरून  पोलिस अधिकार्‍यांनी कोणतीच चौकशी न करता सुनिल हावा यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.सुनील हावा यांनी समाजात चालत असलेल्या अवैध धंद्याविरुद्ध सोशल मिडीया वरती पोस्ट टाकून त्यांच्या विरोधात आवाज उठवल्याबद्दल त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही पत्रकाराची मुस्कटदाबी असुन या विरोधात चाकूर पत्रकार संघाच्या वतीने चाकूर येथे नायब तहसीलदार बालाजी चितळे यांना या मागणीचे निवेदन देण्यात आले व जर उदगीर येथील पत्रकारावरील खोटा गुन्हा दाखल केलेला मागे नाही घेतल्यास चाकूर तालुका पत्रकार संघाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल. सदरील प्रकरणात पोलिस अधिकार्‍यांनी कोणतीही चौकशी न करता राजकीय दबावामुळे पत्रकार सुनील हावा यांच्या विरोधात खोटा गुन्हा दाखल केला आहे. तसेच पत्रकार सुनील हवा यांनी कोणत्याही राजकीय पक्षाच्या किंवा नेत्याच्या विरोधात लिखान केलेले नाही तरी अधिकाऱ्यांनी वैयक्तिक अकसापोटी हा गुन्हा दाखल केला आहे. याची चौकशी करून खोटा गुन्हा दाखल केलेल्या शहराध्यक्ष समिरोद्यीन शेख व कोणतीहि चौकशी न करता गुन्हा दाखल करणाऱ्या अधीकाऱ्यावर निलंबनाची कार्यवाही करावी व पत्रकार सुनील हावा यांना न्याय मिळवून द्यावा यासाठी चाकूर तालुका पत्रकार संघाच्या वतीने नायब तहसीलदार यांच्या वतीने नायब तहसीलदार बालाजी चितळे यांना निवेदन देण्यात आले.निवेदनावर लातुर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष संगमेश्वर जनगावे,चाकूर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष माधवराव तरगुडे,पत्रकार संघाचे सचिव सतिश गाडेकर,अजगर मचकुरी, प्रशांत शेटे, सुधाकर हेमनर, मधुकर कांबळे, विनोद नीला,सदाशिव मोरे, दत्तात्रय बेंबडे, चेतन होळदांडगे, युसुब शेख, अशोक बिराजदार, गणेश स्वामी आदी पत्रकाराच्या स्वाक्षरीने निवेदन देण्यात आले.