वीज बिल न भरल्यास वीजपुरवठा ऑटोमॅटीकिली खंडीत होणार,सरकार बसवणार स्मार्ट मीटर
नवी दिल्लीः विज बिलाची रक्कम ठरवून दिलेल्या वेळेत अदा न केल्यास वीज पुरवठा ऑटोमॅटिकिली खंडीत होणार आहे. त्यामुळे महावितरणच्या लाईन मनला घटनास्थळी जाऊन वीज पुरवठा खंडीत करण्याची आता आवश्यकता राहणार नाही. तसेच वीज बिलाची रक्कम अदा केल्यास वीज पुरवठा पुन्हा सुरु करण्यात येईल. हे शक्य होणार आहे स्मार्ट मीटरने. सरकारच्यावतीने प्रत्येकाच्या घरात आता स्मार्ट मीटर बसवण्यात येणार आहे. भारत सरकारच्या स्मार्ट मीटर राष्ट्रीय कार्यक्रमाअंतर्गत देशभरात दहा लाख स्मार्ट मीटर बसवण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री आरके सिंह यांनी दिली. उत्तर प्रदेश, दिल्ली, हरियाणा आणि बिहारमध्ये प्रथमच स्मार्ट मीटर बसवण्याचे काम सुरु झाले आहे.
स्मार्ट मीटर राष्ट्रिय कार्यक्रम, राष्ट्रिय इलेक्ट्रॉनिक मोबिलीटी कार्यक्रमाच्या डॅशबोर्डचे शुभारंभही यावेळी करण्यात आले. उल्लेखनीय म्हणजे मोबाईलप्रमाणे आता वीजेसाठी रिचार्जची सुविधा प्रदान करण्यात येणार आहे. म्हणजेच, मोबाईलच्या प्रिपेड आणि पोस्टपेड प्रमाणे वीजेसाठी रिचार्ज करता येऊ शकणार आहे. 50 रुपयांपासून पुढे रिचार्जची रक्कम असणार आहे. जितक्या रक्कमेचे रिचार्ज केल्यास तेवढा वीजपुरवठा करण्यात येईल. शिवाय आगाऊ रिचार्ज केल्यास आधीचे रिचार्ज रक्कम पुढे अॅड होणार आहे. शिवाय गरज नसल्यास तुम्ही वीज मीटर देखील बंद करु शकता. जेणेकरुन वीज चोरी, लोड सिस्टम सारख्या प्रकरणांना आळा बसेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येतोयं.
राष्ट्रिय वीज मोबिलिटीविषयी सांगताना आरे सिंह म्हणाले, ईईएसएलद्वारे सुरु करण्यात आलेले इलेक्ट्रिक वाहनांनी आतापर्यंत दोन कोटी किलोमीटरचा आंतर पार केला आहे. ईईएसएलने जवळपास 12 महिन्यात 10.6 मिलियन स्ट्रीट लाईट बदलण्यात आले आहे. या माध्यमातून 36 कोटी एलईडी बल्बचे वितरण करण्यात आले आहे. ईईएसएलद्वारे स्वस्तातले स्वस्त एलईडी बल्ब आणि स्ट्रीट लाईटी उपलब्ध करुन देण्यात आले असून त्यामुळे सरकारच्या उजाला आणि उन्नत ज्योती कार्यक्रमाला प्रोत्साहन मिळाले आहे.
स्मार्ट मीटरचे फायदे
1. घरातील विजेचे लोड वाढल्यास वीजपुरवठा तात्काळ बंद होईल. लोड नियंत्रणात आल्यानंतर वीजपुरवठा आपोआप सुरळीत होईल.
2. कोणत्या टॉन्स्फॉर्मरमधून किती वीज पुरवठा करण्यात आला आहे, कुठे किती वापर झाला आहे यावर स्मार्ट मीटरद्वारे नोंद केली जाणार आहे.
3. वीज बिल ठरवून दिलेल्या अवधीत भरता आले नाही, तर वीज पुरवठा आपोआप बंद होणार आहे. वीज बिल अदा केल्यानंतर वीज पुरवठा सुरळीत होईल. कुठल्या लाईन स्टाफला यासाठी स्थळावर जाण्याची आवश्यकता नाही.
4. रिडिग ऑटोमॅटिकिली नोंद केली जाणार आहे. त्या आधारेच बिलाची रक्कम निश्चित होईल.
5. विज बिलाची आगाऊ रक्कम जमा करणा-यांना प्री-पेडची सुविधा मीटरमध्ये असणार आहे. यात घर बंद ठेवण्याच्या स्थितीत मीटर बंदची सुविधा असणार आहे. त्यामुळे उगाच वीजेचे बिल लाभार्थ्यांना देता येणार आहे.