कर्तव्यभावनेने राजपत्रित अधिकाऱ्यांनी
वचनबद्दतेची घेतली शपथ
लातूर, दि. 28: राज्य शासनाच्या वतीने संघटनेच्या अथक परिश्रमाच्या हाकेला प्रतिसाद देऊन राज्यातील अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसांच्या आठवडा जाहीर करुन सर्वांना दिलासा दिला. याचे औचित्य साधून 28 फेब्रुवारी 2020 रोजी महासंघाच्या निर्देशानुसार जिल्हा परिषद लातूर येथे जिल्ह्यातील राजपत्रित अधिकारी महासंघाच्या पदाधिकारी व सदस्यांनी जिल्हा परिषदेच्या सभागृहात औपचारीक बैठक घेऊन वचन बद्दतेची सामुहिक शपथ घेतली.
यावेळी महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ, लातूर येथील राज्य संघटक डॉ. मधुकर गिरी, मधुकर डोईफोडे, ॲड. अण्णाराव भुसणे, लातूर विभागीय उपाध्यक्ष बाळासाहेब शेलार, जिल्हा समन्वय समितीचे अध्यक्ष प्रभू जाधव, कार्याध्यक्ष डॉ. अनंत गव्हाणे, सहसचिव शाम देव, डी.एम. कुलकर्णी, प्रसिध्दीप्रमुख सुनिल सोनटक्के यांच्यासह कार्यकारणीचे पदाधिकारी तसेच जिल्ह्यातील राजपत्रित अधिकारी जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. रत्नराज जवळगेकर, श्री. किशोर काळे, उदय सांळूके, देवदत्त गिरी आदि उपस्थित होते.